सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात मुसळधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात मुसळधार
सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात मुसळधार

सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात मुसळधार

sakal_logo
By

ओळी
- rat5p37.jpg-

३३९४१
खेड ः दाभीळ येथे दरड कोसळून घरांचे झालेले नुकसान.

- rat5p38.jpg-
३३९४२
राजापूर ः अर्जुना नदीला आलेल्या पुराचे पाणी जवाहर चौकात शिरले.


दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात मुसळधार
---
तीन ठिकाणी दरडी कोसळल्या; राजापुरात पुन्हा पूर
रत्नागिरी, ता. ५ : सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. जगबुडी, शास्त्री, काजळी, अर्जुना, कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारी भागातील वस्तीमधील जनजीवन विस्कळीत झाले. खेड, दाभीळ येथे घरावर दरड कोसळून वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यासह पावसामुळे अन्य तीन ठिकाणी दरडी कोसळल्या. तसेच, १३ हून अधिक गावांत ‘महावितरण’ला फटका बसला.
९ जुलैपर्यंत पावसाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. पाच दिवसांत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली. जिल्ह्यात आज सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड येथे २०५ मिलिमीटर, दापोली १४५, खेड ७४, गुहागर ७७, चिपळूण १६९, संगमेश्वर २१०, रत्नागिरी ६९, राजापूर १२२, तर लांजा येथे ३४२ मिलिमीटर पाऊस झाला.
अर्जुना नदीच्या पुराचे पाणी जवाहर चौकात आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अर्जुना नदीवरील कालवा फुटल्याने शेतीचे नुकसान झाले. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दगड-माती खाली येत असल्याने वाहतूक खंडित झाली आहे. मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांच्या रांगाच्या रांगा महामार्गावर लागल्या आहेत. घाटापासून लोटेपर्यंत दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन हा मार्ग बंद ठेवण्याबाबत प्रशासन निर्णय घेईल. दाभीळ येथे घरावर दरड कोसळली; तर कुंभार्ली घाटात दरड कोसळून वाहतूक एकेरी सुरू ठेवली आहे. खेड-शिवतर मार्गावर दोन झाडे पडून, तर रत्नागिरी-देवरुख मार्गावर पांगरी येथे दरड कोसळून काही काळ वाहतूक खंडित झाली होती. कुंभवेतील अजित गावखडकर यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
संगमेश्वरमधील दोन गावे, तर रत्नागिरी तालुक्यातील पाच गावांत विजेचा खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. दापोलीतील पाच गावांमध्ये विजेचे खांब पडून नुकसान झाले आहे. गणपतीपुळेत रस्त्यावर जुने पिंपळाचे झाड पडल्याने वाहतूक खंडित झाली; तर रत्नागिरीतील काजळी नदीच्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठ बाधित होण्याची भीती होती. मात्र, सायंकाळी पाणी ओसरले. राजापूर जवळेथर येथे दरड कोसळली असून, पूरग्रस्त भागातील चार कुटुंबे नऊ व्यक्ती व सात जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

---
चौकट

जिल्ह्यातील ११४ कुटुंबांचे स्थलांतर
दापोली डोरसईतील दरडप्रवण भागातील तीन कुटुंबांना, खोपी येथील सात कुटुंबांतील २४ व्यक्तींना, तर खेडमधील ३७ कुटुंबातील १०० व्यक्तींना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. खेड शहराजवळील मच्छी मार्केटमध्ये पुराचे पाणी आल्याने आठ व्यवसायिकांचे, चिपळूण पेढे दुर्गवाडी व बौद्धवाडी येथील दरडप्रवण क्षेत्राजवळील चार कुटुंबांतील ३० व्यक्तींचे स्थलांतर केले. दरडप्रवण पांगरी, ओझरे बुद्रुक, तिवरे घेरा प्रचितगड, नायरी, कसबा संगमेश्वर (पारकवाडा शास्त्री पूल), आंबेड खुर्द, मुर्शी साखरपा, कुळये, देवळे घेरा प्रचितगड, शिवणे, काटवली, डिंगणी कुरण या गावांमधील एकूण २७ कुटुंबांतील १०२ व्यक्तींना, तर खंडेवाडी येथील २९ कुटुंबांतील १२० जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74476 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..