दोडामार्गला सतर्कतेचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोडामार्गला सतर्कतेचे आवाहन
दोडामार्गला सतर्कतेचे आवाहन

दोडामार्गला सतर्कतेचे आवाहन

sakal_logo
By

दोडामार्गला सतर्कतेचे आवाहन

जनजीवन विस्कळीत; तहसीलदारांकडून पूरस्थितीचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ५ ः कामाशिवाय कुणीही चार दिवस घराबाहेर पडू नये, असे आवाहन येथील तहसीलदार अरुण खानोलकर यांनी तालुकावासीयांना केले आहे.
तालुक्यातील पूरस्थितीचा मागील अनुभव पाहता एनडीआरएफची तुकडी जूनमध्ये यावी, अशी मागणी केली होती; पण ती आलेली नाही. आता त्याचा पुन्हा पाठपुरावा करू, असेही श्री. खानोलकर म्हणाले. नदीकाठावरील गावातील लोकांचे स्थलांतर करण्याची तयारी पूर्ण झाली असून, त्यासाठी संबंधित गावांत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
तालुक्यात कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्या परिस्थितीचा आढावा तहसीलदार खानोलकर यांनी घेतला. अजून चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत निवासी नायब तहसीलदार सत्यवान गवसही होते.
दोडामार्ग-कोल्हापूर मार्गावरील साटेली भेडशी येथील पुलावर पाणी आल्याने तो रस्ता बंद आहे. त्याऐवजी जुन्या मूळ रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे वाढली आहेत. काजू कलमांच्या फांद्या आणि बांबू रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळा येत आहे. त्या फांद्या व बांबू तोडण्यास संबंधित शेतकरी आडकाठी करत असल्याबद्दल श्री. खानोलकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कॉजवेवर पाणी आलेला रस्ता पर्यायी आहे, तर वरचा रस्ता मूळ व जुना आहे, असे सांगून श्री. गवस यांनी त्यावरील अतिक्रमण हटविण्याची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान, तहसीलदार खानोलकर साटेली भेडशीत पोचले, तेव्हा धो-धो पाऊस कोसळत होता. तो पाहून, आपल्याकडे ऑरेंज अलर्ट दिले असले, तरी पाऊस मात्र रेड अलर्टच्या वेळी कोसळतो तसा कोसळत आहे, असे ते म्हणाले.
............
कोट
सातत्याने पूरस्थिती निर्माण होत असल्याने स्थलांतरित ग्रामस्थांना शाळांमध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्यासाठी भविष्यातील तरतूद म्हणून साटेली भेडशीत कायमस्वरुपी स्वतंत्र इमारत बांधण्याचे प्रशासनाने ठरविले असेल, तर त्याची कल्पना नाही. माहिती घेऊन पाठपुरावाही करीन.
-अरुण खानोलकर, तहसीलदार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74482 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..