
पोलिस ठाण्यात जनजागृती कार्यक्रम
rat0530.txt
बातमी क्र. 30 (पान 5 साठी)
------------
फोटो-
rat5p35.jpg-रत्नागिरी- रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी हातखंबा येथील अ. के. देसाई हायस्कुल येथे बालकांवरील अत्याचार , वाहतुक नियम यावर जनजागृती कार्यक्रम घेतला.
----------
L33924
जिल्ह्यात 16 पोलिस ठाण्यात जनजागृती कार्यक्रम
रक्तदान,वृक्षारोपण ,सायबर गुन्हे ; उत्तम प्रतिसाद
रत्नागिरी, ता. ५ : आजादी का अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधुन जिल्हा पोलिस दलाने काल (ता. ४) एकाच दिवसी जिल्ह्यातील सोळा पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्याच्या संकल्पनेतून विविध विषयावर जागर, मार्गदर्शन आणि वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले.
दापोली पोलिसांनी रक्तदान शिबिर आयोजित केले. यावेळी १०१ दात्यांनी रक्तदान केले. चिपळूण पोलिस ठाण्याने मिरजोळे येथील नॅशनल हास्कुल येथे जातिय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेऊन पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिस दिले. सावर्डे पोलिसांनी न्यु इग्लिश स्कुल दहिवली येथे क्रांतीविरांनी दिलेले योगदान, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारत, या विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित केली. अलोरे पोलिस ठाण्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरगाव, येथे व्यवसाय शिक्षण काळाची गरज, आपत्ती ग्रस्तांचे मनोगत, कायदा व कायद्याचे सुव्यवस्थापन, मोबाईल फायदे व तोटे, या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
देवरूख पोलिस ठाण्यात कांजीवरा परिसर, देवरूखमध्ये विविध प्रकारच्या १०१ झाडे लावण्यात आली. पूर्णगड पोलिस ठाण्यात मेर्वी दुरक्षेत्र परिसरामध्ये विविध प्रकारची दहा झाडे लावण्यात आली. यावेळी मेर्वीचे पोलिस पाटील आणि गावकरी उपस्थित होते. जयगड पोलिसांनी व्यसनमुक्ती व नवीन वाहतुक कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रम व रिक्षा चालक, खासगी वाहतुक चालक, ट्रक चालकांना अमली पदार्थांचे सेवन न करण्याबाबत सूचना दिल्या. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अ. के. देसाई हायस्कुल हातखंबा येथे बालकांवरील अत्याचार , वाहतुक नियम यावर जनजागृती कार्यक्रम घेतला. बाणकोट पोलिस ठाण्याने जर्मन परकार हायस्कुल बाणकोट येथे सायबर क्राईम, महिला अत्याचर , अमली पदार्थ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. रत्नागिरी शहर पोलिसांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सायबर क्राईम (एहसास), वाहतुक सुरक्षा विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. राजापूर पोलिसांनी कनिष्ठ महाविद्यालया ओणी येथे पोलिस काका, पोलिस दीदी, एहसास प्रणाली अंतर्गत सायबर क्राईम , ऑनलाईन फसवणुक यावर मार्गदर्शन केले. नाटे, लांजा, संगमेश्वर, गुहागर खेड पोलिसांनीही या प्रकारचे कार्यक्रम आणि जनजागृती केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74497 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..