जीवनात वेळेचे नियोजन महत्त्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवनात वेळेचे नियोजन महत्त्वाचे
जीवनात वेळेचे नियोजन महत्त्वाचे

जीवनात वेळेचे नियोजन महत्त्वाचे

sakal_logo
By

L३४०३७

कुडाळ ः क्रेडाई वुमन्स विंग सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ हायस्कूलमधील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. (छायाचित्र ः अजय सावंत)

जीवनात वेळेचे नियोजन महत्त्वाचे
मयुरी जैतापकर ः कुडाळात क्रेडाई वुमन्सतर्फे शैक्षणिक साहित्य
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण हा पाया आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. यासाठी मोबाईल, इंटरनेटचा वापर मर्यादित करा, असे प्रतिपादन क्रेडाई वुमन्स विंग सिंधुदुर्गच्या को-ऑर्डिनेटर सौ. मयुरी जैतापकर यांनी केले.
क्रेडाई वुमन्स विंग सिंधुदुर्गच्या वतीने समाजात विविध उपक्रम राबविले जातात. मंगळवारी सायंकाळी शैक्षणिक उपक्रमांतर्गत कुडाळ हायस्कूलमधील गरजू ४० मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम कुडाळ हायस्कूल मुख्याध्यापिका शालिनी शेवळे, उपमुख्याध्यापक दादा शिरहट्टी, दिनेश आजगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी क्रेडाई वुमन्सच्या को-ऑर्डिनेटर सौ. अंजली वालावलकर, गीतांजली कांदळगावकर, राधा शिरसाट, तृप्ती महाडिक आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सौ. जैतापकर म्हणाल्या, "कुडाळ हायस्कूल ज्ञानदानाचे फार मोठे कार्य करीत आहे. हायस्कूलचे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर आहेत. हायस्कूलच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य पातळीवर उज्ज्वल यश संपादन केले आहे. तुम्ही देशाचे भावी नागरिक आहात. क्रेडाईच्या माध्यमातून आज गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा योग आला. भविष्यातही सामाजिक उपक्रमांत निश्चितच कार्यरत राहू. जीवनात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असेल, तर नियोजन महत्त्वाचे आहे. यासाठी मोबाईल, इंटरनेटचा वापर मर्यादित करा." सौ. वालावलकर यांनी कोणतेही शिक्षण गुरुशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. प्रगतीच्या प्रत्येक पावलावर गुरुचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. गुरू विद्यार्थ्यांना घडवीत असतो आणि त्याचा केंद्रबिंदू शाळा असल्याचे सांगितले. सौ. शेवळे, श्री. शिरहट्टी, श्री. आजगावकर यांनी या उपक्रमाचा गरजू मुलांना याचा लाभ झाल्याचे सांगत क्रेडाईचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका व क्रेडाई मेंबर्स सौ. राधा शिरसाट यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74610 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top