सावंतवाडीतील चुकीच्या बांधकामाचा घरास धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतील चुकीच्या 
बांधकामाचा घरास धोका
सावंतवाडीतील चुकीच्या बांधकामाचा घरास धोका

सावंतवाडीतील चुकीच्या बांधकामाचा घरास धोका

sakal_logo
By

L३४०९२

सावंतवाडी ः मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना निवेदन देताना सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी.

सावंतवाडीतील चुकीच्या
बांधकामाचा घरास धोका
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ः चर्मकार मंडळाने वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः शहरातील माठेवाडा भागातील गुलमोहर गृहनिर्माण संस्थेच्या येथील पालिकेच्या मालकीच्या भूखंडावर गार्डनकरिता विकसित केलेले बांधकाम चुकीच्या पद्धतीने केल्याने शेजारी राहणारे रहिवासी वसंत बिबवणेकर यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. हे बांधकाम तत्काळ दुरुस्त करून बिबवणेकर यांच्या घराचे होत असलेले नुकसान थांबवावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली.
शिष्टमंडळाने मंगळवारी सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेत याबाबतचे निवेदन दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण, ॲड. अनिल निरवडेकर, सरचिटणीस गुंडू चव्हाण, सावंतवाडी अध्यक्ष गणेश म्हापणकर, सहसचिव विजय ओटवणेकर, विजय चव्हाण, दिलीप इन्सुलकर, कल्याण कदम, एकनाथ चव्हाण आदी जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी जावडेकर यांनी लवकरच या समस्येवर तोडगा काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले. तसेच गुलमोहर गृहनिर्माण संस्थेतील पालिकेच्या मालकीच्या भूखंडाचे झालेल्या बांधकामाचा पालिका अभियंत्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच स्पॉट पंचनामा करून योग्य रीतीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74648 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..