प्रामाणिक कर्जदारांना अनुदानासाठी हालचाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रामाणिक कर्जदारांना अनुदानासाठी हालचाली
प्रामाणिक कर्जदारांना अनुदानासाठी हालचाली

प्रामाणिक कर्जदारांना अनुदानासाठी हालचाली

sakal_logo
By

प्रामाणिक कर्जदारांना
अनुदानासाठी हालचाली

कर्जमाफी योजना; माहिती संकलितचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः महात्मा फुले कर्जमाफी योजना अंतर्गत नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान देण्याची प्राथमिक अंमलबजावणी राज्याने सुरू केली आहे. सहकार आयुक्तांनी जिल्हा आणि तालुका निबंधकांना २०१७ ते २०२० मध्ये कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करून पाठवण्याचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे नियमित कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहन अनुदान मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यावर २०१९ मध्ये महात्मा फुले कर्ज माफी योजना जाहीर केली होती. त्यांच्या सोबतच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली होती. महात्मा फुले कर्जमाफीची अंमलबजावणी केली. मात्र, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले नव्हते. २०१९ आणि २०२० मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी यावर आवाज उठवला तर राज्याकडून घोषणा केलेल्या पूर्ण न केल्यामुळे प्रोत्साहन अनुदानाची योजना कागदावरच राहिली होती. २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड केलेल्या २० लाख शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटीची तरतूद केली; मात्र, त्यालाही तीन महिने झाले तरी हालचाली होत नसल्यामुळे शेतकऱ्यात संभ्रम होता. आता सहकार आयुक्तांनी जिल्हा आणि तालुका निबंधकांना नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करून पाठवण्याचे आदेश काढले आहेत. २०१७-१८, २०१८-१९ आणि२०१९-२० मध्ये पीक कर्ज आणि परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची माहिती आठ दिवसांत मागवली आहे. विकास सेवा सोसायटी, जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून ही माहिती पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्याने प्रोत्साहन अनुदान योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेला गती दिली असून जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74650 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..