मालवण रोटरी क्लब अध्यक्षपदी रतन पांगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण रोटरी क्लब
अध्यक्षपदी रतन पांगे
मालवण रोटरी क्लब अध्यक्षपदी रतन पांगे

मालवण रोटरी क्लब अध्यक्षपदी रतन पांगे

sakal_logo
By

L३४१३२

रतन पांगे, अभय कदम, रमाकांत वाक्कर

मालवण रोटरी क्लब
अध्यक्षपदी रतन पांगे
नूतन कार्यकारिणी जाहीर ः शनिवारी पदग्रहण समारंभ
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ ः येथील रोटरी क्लबची २०२२-२३ साठी नूतन कार्यकारिणी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी रतन पांगे, सचिवपदी अभय कदम, तर खजिनदारपदी रमाकांत वाक्कर यांची निवड करण्यात आली. नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ ९ ला सायंकाळी ६ वाजता येथील हॉटेल जानकीमध्ये होणार आहे. नवीन वर्षात रोटरीच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष पांगे यांनी दिली.
येथील हॉटेल स्वामीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष उमेश सांगोडकर, महादेव पाटकर, ऋषी पेणकर, संजय गावडे, राजन तांबे, संदेश पवार, महेश काळसेकर, राजेश पारधी आदी रोटरीयन उपस्थित होते. नूतन संचालक मंडळात उमेश सांगोडकर, अभय कवटकर, डॉ. लीना लिमये, प्रा. अनिल देसाई, प्रदीप जोशी, महादेव पाटकर, डॉ. अजित लिमये, सुहास ओरसकर, प्रसन्नकुमार मयेकर, महेश काळसेकर, संजय पेंडूरकर, मेघनाद धुरी, विठ्ठल साळगावकर, प्रा. सुमेधा तिनईकर, डॉ. अच्युत सोमवंशी, संदेश पवार यांचा समावेश आहे.
मालवण रोटरीतर्फे २०२२-२३ च्या नूतन वर्षात सिंधुदुर्ग महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पर्यटकांसाठी सूचना फलक, स्वच्छता मोहीम, ब्लड डोनेशन कॅम्प, समरगीत, वक्तृत्व स्पर्धा, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, अंध बांधवांचा स्नेहमेळावा,
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प, पोलिओ जनजागृती, गुरुपौर्णिमा निमित्ताने गुरुजनांचा सत्कार, लाईव्ह पाककला स्पर्धा, शालेय मुलांना साहित्य वितरण, किशोरवयीन मुलींना लैंगिक विषयावर मार्गदर्शन, फातिमा कॉन्व्हेंटमध्ये दिवाळी, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिरे, शाळा आणि ग्रंथालयांना ४०० पुस्तकांचे वाटप, जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा किंवा बुद्धिबळ स्पर्धा, रोटरी मॅरेथॉन, हॅप्पी स्कूल, व्यापाऱ्यांसाठी कर मार्गदर्शन शिबिर, पर्यटन व्यावसायिक मार्गदर्शन, पाणी अडवा-पाणी जिरवा उपक्रम, टाकाऊ कचऱ्यापासून वस्तू बनविणे, कागदी पिशव्या वाटप असे विविधांगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लबच्या वतीने देण्यात आली.
...............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74685 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top