
विरेश्वर तलाव येथे झाडाची फांदी कोसळली
RATCHL65.JPG
34162
चिपळूणः विरेश्वर तलाव येथे कोसळलेली फांदी.
---------------
विरेश्वर तलाव येथे
झाडाची फांदी कोसळली
चिपळूण, ता. ६ ः शहरातील विरेश्वर तलाव ठिकाणी मार्निंगवॉकच्या मार्गावर भलीमोठी वृक्षाची फांदी कोसळून हा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. विशेष म्हणजे ही फांदी पूर्णतः कोसळली नसून ती झाडावर लटकत आहे. तीन दिवस झाले असले तरी ही धोकादायक फांदी हटवण्यात न आल्याने यातून एखादी दुर्घटनाही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही वर्षापूर्वी पर्यटनाचा लूक देण्यात आलेल्या विरेश्वर तलाव शहराच्या वैभवात भर पडणारे ठरले होते. यातूनच त्यासाठी वृक्षाची लागवडदेखील करण्यात आली होती. असे असताना देखभालीअभावी या तलावाची पडझड झाली असून, सद्यःस्थितीत या तलावाला काहीसे भकास स्वरूप आले आहे. असे असले तरी त्या ठिकाणी कायम नागरिक मार्निंग तर इव्हिनिंग वॉकसाठी येत असताना यासह तलावातील असलेल्या माशांना खाद्य देण्यासाठी हौशी नागरिकदेखील आवर्जून येत असतात. असे असताना हे तलाव स्वच्छतेच्या तसेच झाडीझुडपाने वेढलेले असते. अधूनमधून तलाव परिसर स्वच्छ करण्यात आला असला तरी त्यातही सातत्य नाही.
तलाव सुशोभीकरणादरम्यान लागवड केलेल्या रोपाची भलीमोठी वृक्ष झाली असून, ती सद्यःस्थितीत धोकायदक ठरू लागली आहेत. वृक्षाच्या धोकायदायक असलेल्या फांद्याची वेळीच कटाई न केल्याने त्यामुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात तलावाठिकाणी एका वृक्षाची धोकायदायक फांदी कोसळली आहे. ही फांदी पूर्णतः कोसळली नसून, ती झाडावर लटकत आहे. यातूनच मार्निंगवॉकच्या मार्गावर ती कोसळली असल्याने यामुळे ये-जा करणारा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. तीन दिवस होऊनही ही धोकादायक फांदी न हटवल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74763 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..