चिपळूण ः परशुराम घाटात सारख्या कोसळताहेत दरडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः परशुराम घाटात सारख्या कोसळताहेत दरडी
चिपळूण ः परशुराम घाटात सारख्या कोसळताहेत दरडी

चिपळूण ः परशुराम घाटात सारख्या कोसळताहेत दरडी

sakal_logo
By

RATCHL६४.JPG ः
३४१५८
चिपळूणः परशुराम घाटात सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. पाहणी करणाऱ्या पथकासमोर दरड कोसळली.
---------------
पाहणी पथकासमोर कोसळली दरड
परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद; काही ठिकाणी भेगा
चिपळूण,ता. ६ ः शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे चौपदरीकरणासाठी डोंगरकटाई केलेल्या परशुराम घाटात सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. दरडीच्या धोक्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून, अतिवृष्टी सुरू असेपर्यंत वाहतूक बंदच राहणार आहे. दरम्यान, बुधवारी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी पाहणीसाठी गेले असता त्यावेळी त्यांच्यासमोरच दरड कोसळली. घाटातील वाहतूक बंद असली तरी रस्त्यावर आलेली दरड तत्काळ बाजूला केली जात आहे.
शनिवारी (ता. २) रात्री परशुराम घाटात दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर रात्री ३ पर्यंत घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने छोट्या मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. कल्याण टोलवेज या कंपनीच्या हद्दीत असलेल्या कामाच्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना नियमित सुरू आहेत. परशुरामच्या डोंगरात काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे तेथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटात ठराविक ठिकाणीच दरडी कोसळण्याचा अधिक संभव आहे. घाटातील वाहतूक सुरू असतानाच दरड कोसळल्यास जीवितहानी होऊ शकते. यासाठी तेथील वाहतूक बंद ठेवण्यात आली. अतिवृष्टी सुरू असेपर्यंत ही वाहतूक बंदच राहणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जिल्हा प्रशासनाला तसा अहवाल देण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता प्रकाश निगडे, शाखा अभियंता रॉजर मराठे व सहकारी परशुराम घाटात पाहणीसाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्यासमोरच दरड कोसळली. दरड तत्काळ बाजूला हटवण्यासाठी घाटात मोठी यंत्रणा ठेकेदार कंपनीकडून तैनात केली आहे. दरडीच्या धोक्यामुळेच अतिवृष्टीत घाटातील वाहतूक बंद ठेवली आहे.

चौकट
एसटी फेऱ्यांच्या मार्गात बदल
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट बंद असल्याने मुंबईसह खेड मार्गावरील फेऱ्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. बंद घाट सुरू होईपर्यंत मुंबईकडे जातेवेळी एसटी बसफेरी शेल्डीमार्गे, तर मुंबईहून चिपळूणकडे येतेवेळी चिरणीमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. यामध्ये सकाळी ६ वाजता चिपळूण मुंबई व्हाया खेड, ८ वाजता चिपळूण मुंबई, १० वाजता चिपळूण कासे - बोरिवली, ११ वाजता चिपळूण - मुंबई, दुपारी २ वाजता चिपळूण - बोरिवली, सायंकाळी ६.३० वाजता चिपळूण - ठाणे व्हाया खेड, ७ वाजता चिपळूण - बोरिवली, रात्री ११ वाजता चिपळूण - मुंबई, सकाळी ८ वाजताची चिपळूण - दापोली, तर मध्यवर्ती बसस्थानकातून सोडण्यात येणाऱ्या खेड मार्गावरील बस फेरीचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74780 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..