शेतकऱ्यांच्या शेतात मातीचा थर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांच्या शेतात मातीचा थर
शेतकऱ्यांच्या शेतात मातीचा थर

शेतकऱ्यांच्या शेतात मातीचा थर

sakal_logo
By

rat6p37.jpg, rat6p38.jpg
L34180, 34181
राजापूरः शेतमळ्यांमध्ये पसरलेला मातीचा थर.
---------------
शेतकऱ्यांच्या शेतात मातीचा थर
शीळ प्रकल्पासाठी उत्खनन; भरपाईची मागणी, शेतकरी संतप्त
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ः शहरानजीकच्या शीळ येथे जलसंधारण विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन केले आहे. गेल्या दोन दिवसांमधील संततधारेत या उत्खननमधील माती पावसाच्या पाण्यासोबत वाहत येवून भातशेतीमध्ये पसरली आहे. त्यातून, भातशेतीच्या काही मळ्यांमध्ये मातीचा थर निर्माण झाला असून शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. याचा पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शहरा नजीकच्या शीळ येथे शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत धरणाची उभारणी केली जात आहे. त्यासाठी सुमारे ९६ कोटी रूपयांचा निधीही मंजूर झाला आहे. गाव वस्तीपासून अवघ्या दीड ते दोन किमी अंतरावर सडेभागात हा प्रकल्प उभारला जात आहे. या धरणाचे काम करताना संबंधित ठेकेदाराकडून या धरणप्रकल्प परिसरातील उंबळी सखल, केगदवणे आदी भागामध्ये मोठ्याप्रमाणात उत्खनन केले आहे. एवढेच नव्हे तर, उन्हाळी हंगामामध्ये मोठमोठ्या झाडांची तोड करून दगड उत्खननही केले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांतील सातत्याने पडलेल्या पावसामुळे या वहाळाला मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्या पाण्यासोबत धरण प्रकल्पातील माती मोठ्याप्रमाणात वाहून येऊन लगतच्या भातशेतीमध्ये पसरली आहे. काही शेतांच्या मळ्यामध्ये मातीचा चांगलाच थरही जमा झालेला दिसत आहे. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना भातशेती करणे अशक्य आहे. त्यामुळे या धरण प्रकल्पामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भविष्यात या धरण प्रकल्पामुळे भातशेतीचे होणारे नुकसान आणि संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता या वहाळातील गाळ पूर्णपणे काढण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे.

चौकट
वर्षानुवर्षे वाहत आलेला गाळ
धरण प्रकल्पाच्या येथून वहाळ वाहत येत असून तो अर्जुना नदीला पुढे मिळतो. या वहाळामध्ये वर्षानुवर्षे वाहत आलेला गाळ साचला असून त्यातून वहाळ पूर्णपणे होरला आहे. धरण प्रकल्पाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननामुळे पावसाळ्यात ही माती खाली शेतात येण्याची शक्यता लक्षात घेऊन वहाळातील गाळ काढण्याच्या सूचना महसूल प्रशासनाने संबधित ठेकेदाराला दिले होते. त्याप्रमाणे गाळ काढण्यातही आला आहे. मात्र, काढण्यात आलेला बाहेर काढण्याऐवजी तो वहाळातच बाजूला रचून ठेवण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74781 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..