पावसामुळे तालुक्यात 2 लाख 93 हजाराचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे तालुक्यात 2 लाख 93 हजाराचे नुकसान
पावसामुळे तालुक्यात 2 लाख 93 हजाराचे नुकसान

पावसामुळे तालुक्यात 2 लाख 93 हजाराचे नुकसान

sakal_logo
By

संगमेश्वर तालुक्यात पावसामुळे
सुमारे तीन लाखाचे नुकसान
देवरूख, ता. ६ ः मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कांजिवरा, काटवली, पुर्येतर्फ देवळे येथे २ लाख ९३ हजार २०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद देवरूख तहसील कार्यालयात बुधवारी केली आहे. गेले चार दिवस संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी पुर्येतर्फे देवळे येथील निर्मला श्रीपत मोरे यांच्या घरावर झाड कोसळून १ लाख ३१ हजार १०० रुपयांचे नुकसान झाले आहे. देवरूख कांजीवरा येथील जिल्हा परिषद शाळेची मुतारी व शौचालय खचून १ लाख ५० हजार व काटवली येथील मालू बाबू वरक यांच्या घराचे १२ हजार २०० रुपये नुकसान झाल्याची माहिती देवरूख तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे. या घटनेचा पंचनामा महसूल विभागाच्यावतीने केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74809 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top