रत्नागिरी ः जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
रत्नागिरी ः जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

रत्नागिरी ः जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

sakal_logo
By

- rat06p35.jpg-
३४१५४
खेड ः घरावर झाड कोसळून झालेले नुकसान.


जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

सरासरी १५८ मिमी नोंद; किनारपट्टीला वेगवान वारे


रत्नागिरी, ता. ६ः राजापूर, खेड वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. जगबुडी, अर्जुना नदीचे पाणी अजूनही काही ठिकाणी साचून राहिले आहे. पाऊस कमी झाल्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे; मात्र दोन दिवस किनारपट्टी भागात वेगवान वारे आहे. दरम्यान, समाधानकारक पावसामुळे भात लावणीच्या कामांना वेग आला आहे.
बुधवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. लांजा तालुक्यात गेल्या दोन दिवसांमध्ये सर्वाधिक पावसांची नोंद झाली आहे. तुलनेत रत्नागिरी तालुक्यात शंभर मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. रत्नागिरीतील काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी ओसरले आहे. जोर कमी झाला असला तरीही दरडी कोसळणे, झाडे पडून घरांचे नुकसान होणे यासारखे प्रकार सुरूच आहेत. राजापुरात दिवसभर संततधार सुरू होती. अर्जुना, कोदवली नद्यांच्या पुराचे पाणी बुधवारी दुपारपर्यंत ठिकठिकाणी साचून होते; मात्र घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नद्यांचे पाणी कमी होऊ लागले आहे. जवाहर चौकातील पाणी सायंकाळी ओसरल्याने व्यावसायिकांनी निःश्‍वास सोडला. जगबुडीचा पूर ओसरू लागला असला तरीही मच्छीमार्केट, देवळे बंदर या परिसरात अजूनही पाणी साचून आहे. पावसाचा जोर वाढला तरी पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती होती. खेड तालुक्यातील शिवतर रोड येथे घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सुर्दैवाने, घरातील लोकांना दुखापत झालेली नाही. दापोली तालुक्यातील इकबालनगर येथे एका घराची संरक्षक भिंत कोसळल्याने आजूबाजूच्या पाच घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यातील २९ लोकांचे स्थलांतर करण्यात आले. संगमेश्‍वर तालुक्यातील पुर्येतर्फे देवळे येथे एका घराचे १ लाख ३१ हजार रुपयांचे नुकसान झाले. चिपळूणमध्ये वेरळ-खोपी येथे मोहल्ल्यामध्ये झाड कोसळून एक तास वाहतूक बंद होती तर खेर्डी-टेरव येथे कामथे दरम्यान दरड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाट अजूनही बंदच ठेवण्यात आला आहे.

---
चौकट
सर्वाधिक पाऊस दापोलीत
सलग दोन दीडशे मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मंडणगड १९५, दापोली २२४, खेड १०९, गुहागर १५३, चिपळूण १६५, संगमेश्वर १४४, रत्नागिरी ९३, राजापूर १४९, लांजा १९१ मिमी पाऊस झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74836 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..