अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे एनडीआरएफचे पथक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे एनडीआरएफचे पथक
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे एनडीआरएफचे पथक

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे एनडीआरएफचे पथक

sakal_logo
By

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे
एनडीआरएफचे पथक
१८ जवान दाखल ; खेडमधील पुरप्रवण क्षेत्राची पाहणी
खेड, ता. ६ः गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे खेड शहर परिसरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोसळणाऱ्या संततधारेने जगबुडी नदी आणि नारंगी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीचा देण्यात आलेला रेड अलर्ट लक्षात घेऊन खेड तालुक्यात आज सकाळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात खेड बाजारपेठेसह आजूबाजूच्या परिसरात जगबुडी व नारंगी नदीच्या पुराचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी या ठिकाणी पुरग्रस्तांना वाचविण्यासाठी आवश्यक बोटी व अन्य साहित्य देखील उपलब्ध नव्हते. रत्नागिरी आणि दापोली सह मुंबई येथून बोटीसह इतर साहित्य आणावे लागले होते. त्यामुळे यावेळी अतिवृष्टीच्या दरम्यान लागणारी सर्वोतोपरी तयारी खेड पालिका व तालुका प्रशासनाने यापूर्वीच करून ठेवली आहे. सद्यस्थितीत कोसळणारा पाऊस व हवामान खात्याने दिलेला रेड अलर्ट ओळखून या ठिकाणी केंद्रशासनाच्या वतीने नॅशनल डिझास्टर रिस्पॉस फोर्सच्या १८ जवांनाची एक तुकडी खेड शहरात दाखल झाली आहे. सकाळी त्या पथकाने खेड शहरातील मच्छीमार्केट परिसर, देवणे बंदर, सुसेरीकडे जाणारा रस्ता, खेड दापोली रस्ता, चिंचघर सह भोस्ते पुल या सारख्या पुरप्रवण क्षेत्राची पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत प्रांताधिकारी राजेश्री मोरे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74844 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..