बिळवस-हुमरोस मार्गावर साकव खचल्याने धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिळवस-हुमरोस मार्गावर साकव खचल्याने धोका
बिळवस-हुमरोस मार्गावर साकव खचल्याने धोका

बिळवस-हुमरोस मार्गावर साकव खचल्याने धोका

sakal_logo
By

34191
बिळवस ः हुमरोसवाडीतील खचलेला साकव.

बिळवस-हुमरोस मार्गावर
साकव खचल्याने धोका
मालवण, ता. ६ ः तालुक्यातील बिळवस-हुमरोस मार्गावरील साकव खचल्याने धोका निर्माण झाला आहे. सरपंच मानसी पालव, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर आदींनी साकवाची पाहणी केली. याबाबत सरपंच पालव यांनी संबंधित विभागांचे लक्ष वेधले असून, साकवाची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी केली आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी संबंधित विभाग जबाबदार राहील, असा इशाराही पालव यांनी दिला.
बिळवस-हुमरोस येथील साकव खचल्याची माहिती मिळताच सरपंच पालव, ग्रामसेवक प्रभुगावकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव, रंजना पालव, राहुल पालव, प्रकाश फणसे, संतोष काशिराम पालव यांनी भेट देत पाहणी केली. हुमरोसवाडीतील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी याच साकवाचा वापर वाहतुकीसाठी करतात. हा मार्ग जवळचा असल्याने विद्यार्थी, वृद्ध, ग्रामस्थ, महिला प्रवास करताना साकव खचल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सध्या कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी पाण्याचाही प्रवाह मोठा असतो. यामुळे भविष्यात अपघाताची भीती निर्माण झाली आहे. संबंधित अधिकारी वर्गाने याची पाहणी करून तातडीने उपाय योजने आवश्यक आहे. अन्यथा शाळेतील मुलांची आणि ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी युवा सेनेचे पदाधिकारी राहुल सावंत तसेच माळगाव सरपंच नीलेश खोत आदींनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74865 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..