
दोडामार्ग विज अधिकाऱ्यांना घेराओ
swt81.jpg
34505
दोडामार्गः येथील महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करताना भाजपचे पदाधिकारी.
दोडामार्ग विज अधिकाऱ्यांना घेराओ
पुरवठा विस्कळीतः भाजप आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ८ ः संपूर्ण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने भाजपच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या येथील उपविभागीय कार्यालयाला घेराओ घातला आणि उपकार्यकारी अभियंता संतोष नलावडे यांना धारेवर धरले. वीज पुरवठा खंडित झाल्यास महालक्ष्मी विद्युत कंपनीची वीज दोडामार्गात तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी आणि साटेली भेडशी कार्यालयातील सहायक अभियंत्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, नगरसेवक संतोष नानचे, राजू प्रसादी, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, रमेश दळवी, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग बोर्डेकर, नाना देसाई, संजय विर्नोडकर, सुरेंद्र सावंत, संतोष हडीकर, सुनील म्हावळणकर उपस्थित होते. तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा लक्षात घेता कायमस्वरूपी सुरळीत वीज पुरवठा करावा, विद्युत वाहिन्यांवर आलेली झाडी तोडून साफ करावी अणि गरजेच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशी मागणी केली. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता नलावडे यांनी साटेली भेडशी , दोडामार्ग आणि तळकट परिसरातील प्रश्न गणेशोत्सवापुर्वी सोडवू असा शब्द दिला. त्यामुळे घेराओ मागे घेण्यात आला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75291 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..