
कुवळेतील बीएसएनएल टॉवरचे खासदार राऊतांच्या हस्ते उद्घाटन
L34506
टीपः swt८२.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - कुवळे ः येथील मोबाईल टॉवरचे खासदार विनायक राऊत यांच्या उद्घाटन झाले. यावेळी अतुल रावराणे, संजय पडते उपस्थित होते. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
कुवळेतील बीएसएनएल टॉवरचे
खासदार राऊतांच्या हस्ते उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ८ ः तालुक्यातील कुवळे येथील बीएसएनएल टॉवर ग्राहकांच्या सेवेत रूजू झाला. नव्याने उभारण्यात आलेल्या टॉवरचे उद्घाटन काल (ता.७) खासदार विनायक राऊत यांच्या झाले. जिल्ह्यात १०४ मंजुर टॉवरपैकी आतापर्यत ७३ टॉवर पूर्णत्वास गेले असून यामध्ये कुवळे टॉवरचा समावेश आहे. लवकरच आणखी १२ टॉवर सेवेत रूजू होतील, असे श्री. राऊत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, दत्ता दळवी, आप्पा पराडकर, नागेंद्र परब, राजू शेट्ये, रवींद्र जोगल, बीएसएनएलचे श्री. देशमुख, सरपंच संगीता कदम, उपसरपंच सुभाष कदम, ग्रामसेवक एस. बी. पोवार, धमेंद्र वळंजू, रघुनाथ लाड, अरूण कोदे, महेंद्र परब यांच्यासह अन्य उपस्थित होते. श्री. राऊत म्हणाले, "जिल्ह्यात १०४ टॉवर मंजुर करण्यात आले होते. टप्याटप्याने त्याची उभारणी सुरू असून आतापर्यंत ७३ टॉवर सुरू झाले आहेत. आणखी १२ टॉवर लवकरच कार्यान्वित होतील. याशिवाय आणखी १२७ टॉवरची मागणी आहे. बीएसएनएल ग्रामीण भागाचा श्वास असून बीएसएनएल जगवली पाहिजे. त्यासाठी अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. कुवळे येथे टॉवरसाठी बॅटर्यांची लवकरच सोय करण्यात येईल." यावेळी अरूण कोदे यांनी मनोगत व्यक्त केले. विलास साळसकर यांनी प्रास्ताविकात टॉवरची गरज, पाठपुरावा याबाबत माहिती दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75292 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..