राजापूर-सर्वसामान्यांचा नेता ; आमदार राजन साळवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-सर्वसामान्यांचा नेता ; आमदार राजन साळवी
राजापूर-सर्वसामान्यांचा नेता ; आमदार राजन साळवी

राजापूर-सर्वसामान्यांचा नेता ; आमदार राजन साळवी

sakal_logo
By

(टुडे पान 3 साठी)
( सर्वमिळून अर्धेपान आहे. पावपेज जाहिराती आणि पावपेज लेख आहे.)
....
आमदार राजन साळवी वाढदिवस विशेष----डोके
---
-rat8p23.jpg
34528
- आमदार राजन साळवी
------------

गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमीच समरस होणारे, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सतत धडपडत राहणारे एवढेच नव्हे तर अन्यायाला वाचा फोडताना ''कमी तिथे आम्ही'' याप्रमाणे नेहमीच लोकसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेल्या आमदार राजन साळवींना ''सर्वसामान्यांचा नेता'' म्हटले तर वावगे ठरू नये. गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना संघटनेंतर्गत झालेल्या पडझडीमध्ये राजन साळवी यांनी आपल्या कृतीतून पक्षनिष्ठा म्हणजे काय असतं, हे साऱ्‍यांना दाखवून दिले आहे. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले शिवसेनेचे उपनेते आणि राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांचा शनिवारी (ता. ९) वाढदिवस. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा......
-----------
सर्वसामान्यांचे नेते; आमदार राजन साळवी

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदूत्ववादी विचारांनी प्रेरित झालेल्या राजन साळवींनी ऐन तारुण्याच्या, उमेदीच्या काळात सर्व्हे खात्यामध्ये असलेली चाकोरीबद्ध नोकरी सोडली अन् एक सच्चा आणि हाडाचा शिवसैनिक म्हणून सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सेनेचा भगवा खांद्यावर घेतला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत सर्वसामान्य गोरगरिब, आबालवृद्धांपासून थोरा-मोठ्यापर्यंत सर्वांच्या हृदयात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले. त्याच जोरावर त्यांनी संघटनेमध्ये विविध पदे यशस्वीपणे भूषवताना जिल्ह्यामध्ये संघटनेचा पाया अधिक मजबूत करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. पद, प्रतिष्ठा, मानसन्मान, खुर्ची पदरी आल्यानंतर अनेकांचे व्यक्तिमत्व अहंभावाने भारल्याचे चित्र दिसते. त्याला श्री. साळवी अपवाद आहेत. सत्तेच्या मखरात बसून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रतिष्ठेची अंगावर असलेली झूल बाजूला सारून श्री. साळवी रस्त्यावर उतरल्याचे चित्र अनेकवेळा पाहायला मिळते.
विकासाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करणे, ही लोकप्रतिनिधींकडून लोकांनी अपेक्षा ठेवणे गैर नाही. त्यांनी ते सोडवलेही पाहिजेत; मात्र, त्याचवेळी धडाडी, धाडस आणि आपुलकीने भारलेला स्नेहही त्यांच्याकडून सर्वसामान्यांना अपेक्षित असतो. या साऱ्‍या गुणवैशिष्ट्यांना श्री. साळवी यांनी वेळोवेळी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर खऱ्‍या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला. जनसंपर्काचा आदर्शवत वस्तूपाठ घालणाऱ्‍या श्री. साळवी यांनी आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाच्या जोरावर स्वकियांसह विरोधकांमध्येही आपुलकीसह आदराचे नाते निर्माण केले आहे. सर्वोत्कृष्ट जिल्हाप्रमुख ते तिसऱ्‍यांदा राजापूरचे आमदार अशी कारकिर्द बहरलेल्या श्री. साळवी यांनी स्वतःच्या कारकिर्दीसह ज्यांनी साथ दिली, ज्यांच्यावर विश्‍वास टाकला, अशा सहकाऱ्‍यांची कारकिर्द बहरण्यासाठी दिलेल्या योगदानामध्ये त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि आजपर्यंतच्या यशाचे गमक दडलेले दिसते. सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यायचा असो, विकासकामांचा पाठपुरावा वा कोरोना महामारी, इतरांच्या सुख-दुःखात स्वतःचे सुख शोधणारे राजन साळवी यांनी एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणून स्वतःचा ठसा उमटवला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना संघटनेंतर्गत झालेल्या पडझडीमध्ये राजन साळवी यांनी आपल्या कृतीतून पक्षनिष्ठा म्हणजे काय असते, हे साऱ्‍यांना दाखवून दिले आहे. अनेकांच्या संकटाच्या काळात बजावलेली ''कृष्णा''ची भूमिका, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारा नेता, विविध सेवासुविधांच्या माध्यमातून बनलेले गरिबांचे देवदूत आमदार श्री. साळवींना दीर्घायुष्य लाभताना त्यांच्या बहरत्या कारकिर्दीचा आलेख भविष्यामध्ये असाच चढता राहो आणि सामाजिक सेवेचा कार्यविस्तार होण्यासाठी मंत्रिपदाचा ''लाल दिवा'' मिळो हीच त्यांना वाढदिवशी सदिच्छा!
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75302 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..