कलम बांधणीचे वेर्लेत प्रात्यक्षिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलम बांधणीचे
वेर्लेत प्रात्यक्षिक
कलम बांधणीचे वेर्लेत प्रात्यक्षिक

कलम बांधणीचे वेर्लेत प्रात्यक्षिक

sakal_logo
By

टीपः swt८११.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - वेर्ले ः विद्यार्थांना कलम बांधणी प्रात्यक्षिकचे धडे देताना मनोहर परब.

कलम बांधणीचे
वेर्लेत प्रात्यक्षिक
सावंतवाडी, ता. ८ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे अंतर्गत ''बळीराजासाठी एक दिवस'' या स्तुत्य उपक्रमाचे औचित्य साधुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेर्ले क्रमांक ३ या प्रशालेत आंबा कलम बांधणीचे प्रात्यक्षिक स्वरुपात मार्गदर्शन कवी तथा रांगोळीकार, कृषी विषयाची आवड असणारे मनोहर परब यांनी केले. यावेळी खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक चंद्रकांत राऊळ, शा. व्य. समितीचे अध्यक्ष हेमलता मेस्त्री, विनया बिडये, भावना राणे, राऊळ तसेच पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. कोकणात शेती व्यवसाय हा मुख्य असल्याने भात पिक लागवड तसेच फळझाड लागवड केली जाते. या अनुषंगाने व्यवसायिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन मुलांना कलम बांधणीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळू शकते तसेच कलम बांधणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी तसेच शेतीविषयक अवजारांची माहिती, रानभाजी पाल्याची ओळख आणि आरोग्यासाठी लाभदायक या विषयी सविस्तर मार्गदर्शन परब यांनी केले. भात शेतीविषयक आवड निर्माण होण्यासाठी प्रत्येकानी भात लागवड केली पाहिजे.विद्यार्थ्यांनी आवड निर्माण करावी याबाबत मार्गदर्शन चंद्रकांत राऊळ यानी केले.यावेळी काही मुलानी कलम बांधणीचे प्रात्यक्षिकही केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75340 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..