अमृत जवान सन्मान अभियान जिल्हा प्रतिनिधीपदी राऊळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृत जवान सन्मान अभियान
जिल्हा प्रतिनिधीपदी राऊळ
अमृत जवान सन्मान अभियान जिल्हा प्रतिनिधीपदी राऊळ

अमृत जवान सन्मान अभियान जिल्हा प्रतिनिधीपदी राऊळ

sakal_logo
By

L३४५६३

सावंतवाडी : दीपक राऊळ यांना शुभेच्छा देताना पी. एफ. डान्टस, शिवराम जोशी, सुनिल राऊळ आदी.

अमृत जवान सन्मान अभियान
जिल्हा प्रतिनिधीपदी राऊळ
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः शहिद जवान, माजी सैनिक व सेवेत असलेले सैनिक यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ''अमृत जवान सन्मान अभियान'' या शासनाच्या उपक्रमात इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे प्रतिनिधी म्हणून दिपक राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अभियानाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून त्यांनी नुकतेच इंडियन एक्स सव्हिस लिगच्या सिंधुदुर्ग शाखेला पत्र पाठवून श्री. राऊळ यांची नियुक्ती झाल्याचे कळविले आहे.
सैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय यांच्याकरिता शासनाने ''अमृत जवान सन्मान अभियान''ची स्थापना केली आहे. या अभियानामध्ये प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर कमिट्या स्थापन करून प्रत्येक कमिटीवर माजी सैनिक संघटनेचा एक प्रतिनिधी घ्यावा, असे शासनाचे जिल्हाधिकारी यांना आदेश आहेत. जिल्हाधिकारी व सर्व तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी यांना या शासन आदेशाप्रमाणे अभियानामध्ये माजी सैनिकांना प्रतिनिधी म्हणून समावून घेण्याबाबत इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग, सिंधुदुर्ग शाखेने कळविले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा केंद्राचे प्रतिनिधी म्हणून श्री. राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सावंतवाडी येथे झालेल्या माजी सैनिकांच्या इंडियन एक्स सव्हिसेसच्या जिल्हा शाखेच्या सभेमध्ये संघटनेचे माजी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन शिवराम जोशी, व्हाईस चेअरमन हिंदबाळ केळूस्कर, संचालक सुभाष सावंत, बाबुराव कविटकर, दिनानाथ सावंत, शिवाजी परब, राजाराम वळंजू, शशिकांत गावडे, बाळकृष्ण गावडे, दिपक शेटये, कृष्णा परब, व्हिक्टर पिंटो, भिवा गावडे, चंद्रशेखर जोशी, शशिकांत मोरजकर, भास्कर कोचरेकर, लक्ष्मण राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75343 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top