
निरोगी आयुष्यासाठी योगसाधना आवश्यक
L34584
देवगड ः येथे आनंद देव यांचे सुरेश गोगटे स्वागत केले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
निरोगी आयुष्यासाठी
योगसाधना आवश्यक
आनंद देव ः देवगडात स्थानिकांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ८ ः आयुर्वेदाला ऋषीमुनींपासूनची जुनी परंपरा आहे. आपली बुध्दी, शरीर, मन तजेदार राहण्यासाठी उत्तम आहाराबरोबरच योग प्राणायाम आवश्यक आहे. योगातून अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत होईल, असे मत हरिद्वार येथील आनंद देव यांनी आज येथे व्यक्त केले. जीवनात क्रांती, शांती येण्यासाठी योग गरजेचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
रामदेव बाबा यांचे सहकारी योग मार्गदर्शक श्री. देव यांनी तालुक्याला भेट दिली. त्यावेळी येथील स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. स्थानिक समितीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. श्री. देव म्हणाले, "निरोगी आयुष्यासाठी योगसाधना गरजेची आहे. योगाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आपल्याबरोबर इतरांचे जीवन सुखी होण्यासाठी योग अंगीकारला पाहिजे. शरीर, मन, बुध्दी, आत्मा आनंदी राहण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. अधिक धनापेक्षा उत्तम आरोग्य असणे आवश्यक ठरते. गुरू, ऋषी यांच्या माध्यमातून ज्ञान प्राप्ती होते. त्यामुळे दुःखी, असमर्थ न होता योगातून जीवन फुलवण्याचे सामर्थ्य ठेवावे." यावेळी त्यांनी आहाराची पध्दत, शरीर शुध्दीचे प्रकार, प्राणायामाचे महत्व विशद केले. यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, सुरेश गोगटे, दत्तात्रय जोशी, दिनेश खाडीलकर, केवल ठाकूरदेसाई, गणेश गोडबोले, सुरेश सोनटक्के, प्रणाली मराठे, भाग्यश्री जोशी यांच्यासह अन्य उपस्थित होते. दरम्यान, पतंजलीसाठी दिलेल्या जागेची त्यांनी पहाणीही केली. तसेच पतंजली आयुर्वेदिक औषध विक्री केंद्रालाही त्यांनी भेट दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75365 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..