संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

--------------
कृषितंत्र विद्यालयात काजू लागवड प्रात्यक्षिक
खेड ः कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड, (मुंबई) संचलित कृषितंत्र विद्यालय, सुकिवली येथे कृषी पर्यवेक्षक तृप्ती लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे काजू लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिकासाठी काजूच्या वेंगुर्ला ४ या जातीची निवड करण्यात आली. यामध्ये प्रक्षेत्रावर सात मीटर बाय सात मीटर अंतरावर आखणी करून दोन फूट लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे करण्यात आले. या खड्ड्यांमध्ये शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट आणि वाळवी नियंत्रणाकरिता पायरी बॉन पावडर टाकण्यात आली. त्यानंतर खड्ड्यांमध्ये माती भरून काजूरोपांची लागवड करण्यात आली. या वेळी प्रात्यक्षिक शिक्षक माळी, कृषी सहायक पाटील, बगडे, खांबे, तांबे आदी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकामध्ये कृषितंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75390 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top