रत्नागिरी ः आपले सरकारची 498 केंद्रांचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः आपले सरकारची 498 केंद्रांचा आधार
रत्नागिरी ः आपले सरकारची 498 केंद्रांचा आधार

रत्नागिरी ः आपले सरकारची 498 केंद्रांचा आधार

sakal_logo
By

आपले सरकारः लोगो
....
४९८ केंद्र सुरळीत; ३६ केंद्र

दाखले, प्रमाणपत्र गावातच; ३६ केंद्रांवर ऑपरेटर नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः नागरिकांना आवश्यक सर्व प्रमाणपत्रे ऑनलाइन मिळावीत यासाठी राज्य सरकारने आपले सरकार पोर्टल सेवा सुरू केली आहे. जिल्ह्यात ५२७ केंद्रांना मंजुरी मिळाली असून, ४९१ केंद्रांचे कामकाज सुरळीत आहे तर ३६ केंद्रांवर ऑपरेटरअभावी कामकाज खोळंबले आहे.
राष्ट्रीयता प्रमाणपत्र, कृषिदाखला, जन्मदाखला, आधारकार्ड, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र यांसह विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी अर्जदारांना तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामधून लोकांना सूट मिळावी यासाठी आपले सरकार ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या लोकसंख्येची गावे किंवा कमी लोकसंख्येची गावे एकत्र येऊन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ही सेवा चार वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटरचीही नेमणूक झाली. त्यांना आवश्यक साहित्य ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करून दिले जाते. हे केंद्र सुरू करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीला संबंधित ग्रामपंचायतीकडून १२ हजार ३३१ रुपये दर महिन्याला भरावे लागत आहेत. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील लोकांची सोय झाली. रांगांमध्ये तासनतास उभे राहण्यापासून सुटका झाली आहे.
..
चौकट
नेटवर्कचा प्रश्‍न
जिल्ह्यात ५२७ केंद्रांना मंजुरी मिळाली होती. त्यातील ४९१ केंद्रांमध्ये सध्या ऑपरेटर कार्यरत असून तेथील संदर्भ सेवा योग्य पद्धतीने लोकांना दिल्या जात आहेत. यामध्ये नेटवर्कचा प्रश्‍न असून बीएसएनएलची ऑप्टिकल फायबर योजना लागू केल्यानंतर सुटू शकतो. सध्या ग्रामपंचायत बीबीएनएलची सेवा घेत आहे तर काही ठिकाणी ऑपरेटर मोबाईलच्या नेटचा वापर या सेवेसाठी करत आहे.
--------------
चौकट
तालुका* मंजूर केंद्र*चालू केंद्र
मंडणगड*२३*२०
दापोली*५८* ५५
खेड*५६*५०
गुहागर*५४*५२
चिपळूण*६८* ६६
संगमेश्‍वर*७२*६४
रत्नागिरी*८६*८२
लांजा*३७*३७
राजापूर*७३*६५

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75407 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..