गुहागर-आरक्षण सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर-आरक्षण सोडत
गुहागर-आरक्षण सोडत

गुहागर-आरक्षण सोडत

sakal_logo
By

गुहागर गण आरक्षण सोडत १३ ला
गुहागर ः तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत १३ जुलैला दुपारी १२ वा. येथील पंचायत समिती सभागृहात काढण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण सोडत १३ जुलैला दुपारी ३ वा. सावरकर नाट्यगृह मारुतीमंदिर रत्नागिरी येथे काढण्यात येणार आहे. तालुक्यात पुन्हा पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. असगोली, शृंगारतळी, कोंडकारूळ, वेळणेश्वर व पडवे हे पाच जिल्हा परिषद गट आहेत तर असगोली, अंजनवेल, शृंगारतळी, तळवली, कोंडकारूळ, मळण, वेळणेश्वर, शीर, पडवे, पाचेरीसडा हे दहा पंचायत समिती गण निर्माण करण्यात आले आहेत. गुहागर पंचायत समितीच्या नव्याने रचना झालेल्या गणांमध्ये महिला राखीव गण कोणते, हे आरक्षण सोडतीनंतर निश्चित होईल. त्याकरिता १३ जुलैला पंचायत समिती सभागृह गुहागर येथे दुपारी १२ वा. होणारी आरक्षण सोडत महत्त्वाची आहे. या आरक्षणाचे प्रारूप १५ जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १३ ते २१ जुलै या दरम्यान आरक्षणावर हरकती व सूचना सादर करावयाच्या आहेत.
-----------


-------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75411 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..