कणकवली : पोलीस कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : पोलीस कारवाई
कणकवली : पोलीस कारवाई

कणकवली : पोलीस कारवाई

sakal_logo
By

L३४६१५

कणकवली : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठा आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली.
--------------------

कणकवलीत ३ बुलेटस्वारांवर कारवाई
कर्णकर्कश आवाज असल्‍याने एक हजाराचा दंड

कणकवली, ता. ८ : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज कर्णकर्कश आवाज करणाऱ्या तिघा बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली. या तिघांकडून प्रत्‍येकी १ हजार रुपये असा ३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ही कारवाई केली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले दोन दिवस पोलिस बंदोबस्त कार्यरत आहे. या बंदोबस्ताचा आढावा घेण्याकरता अप्पर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे कणकवलीत आले होते. यावेळी त्‍यांना महामार्गावरून तीन बुलेटस्वारांच्या वाहनातून कर्णकर्कश आवाज येत असल्‍याची बाब लक्षात आली. या तिघाही बुलेट स्वारांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबविण्यात आले. त्‍यांनतर कणकवली पटवर्धन चौकात कार्यरत असणारे वाहतूक पोलिस चंद्रकांत माने यांना तेथे बोलावून घेत तीन बुलेटस्वारांना प्रत्येकी १ हजार याप्रमाणे दंड करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75418 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..