कणकवली : अपील फेटाळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : अपील फेटाळले
कणकवली : अपील फेटाळले

कणकवली : अपील फेटाळले

sakal_logo
By

जानवली सरपंच शुभदा रावराणे
यांच्या विरोधातील अपील फेटाळले
सकाळ वृतसेवा
कणकवली, ता.८ : तालुक्यातील जानवली ग्रामपंचायत च्या सरपंच शुभदा रावराणे यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका ग्रामस्थाने तक्रार केली होती. या तक्रारीच्या चौकशी अंती विभागीय आयुक्तांना अहवाल पाठवण्यात आला होता. या अपिलाच्या सुनावणीत विभागीय आयुक्तांनी तक्रारदार याची तक्रार फेटाळत सरपंच शुभदा रावराणे यांना दिलासा दिला आहे. विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी याबाबतचे आदेश पारित करत तक्रारदारभालचंद्र दळवी यांची तक्रार फेटाळली आहे.
सरपंच शुभदा रावराणे यांनी पीयूसी व सर्विसिंग सेंटर साठी दिलेला नाहरकत दाखला ग्रामपंचायत च्या मासिक सभेत ठराव न घेता व वने जमिनीत विनापरवाना परवानगी दिलेली आहे. तसेच जानवली येथे किराणा मालाच्या व्यवसायाकरता देखील दिलेला दाखला मासिक सभेमध्ये ठराव न घेता दिला आहे. या सोबत समर्थ एंटरप्राइजेस यांचा असेसमेंट करताना मासिक सभेत आयत्या वेळच्या विषयात अटींची पूर्तता न करता बहुमताने ठराव घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायत ने खरेदी केलेल्या नऊ पैकी पाच पाईप चोरीला गेल्या बाबत व ग्रामपंचायत ची मालमत्ता चोरीला गेल्या संदर्भात पोलिसात तक्रार न करणे हे आरोप होते.
विभागीय आयुक्तांनी काढलेल्या निष्कर्षामध्ये सरपंच शुभदा रावराणे यांनी पीयूसी, सर्विसिंग सेंटर तसेच किराणा मालाच्या व्यवसायाकरता स्वतःच्या सहीने ना हरकत दाखले दिले. परंतु ही बाब निदर्शनास आल्यानंतर २८ मे २०२१ च्या मासिक सभेच्या ठरावानुसार मान्यता घेण्यात आली.समर्थ एंटरप्राइजेस या इमारतीच्या असेसमेंटकरिता ग्रामपंचायत ने पूर्णत्वाचा दाखला व त्रुटींची पूर्तता करून कार्यवाही करण्याबाबत ठराव केला. पाईप खरेदी ही सरपंच शुभदा रावराणे यांच्या कालावधीत झालेली नाही. असे चौकशीत स्पष्ट झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75424 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..