चिपळूण ः चिपळुणात मनसेच्या बैठकीत नाराजांनी माडली व्यथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः चिपळुणात मनसेच्या बैठकीत नाराजांनी माडली व्यथा
चिपळूण ः चिपळुणात मनसेच्या बैठकीत नाराजांनी माडली व्यथा

चिपळूण ः चिपळुणात मनसेच्या बैठकीत नाराजांनी माडली व्यथा

sakal_logo
By

- RATCHL८४.JPG
34599
चिपळूण ः अमित ठाकरे यांचे स्वागत करताना मनसेचे तालुका उपाध्यक्ष व बोरगावचे सरपंच सुनील हळदणकर.
-----------
चिपळुणातही मनसे बैठकीत नाराजीनामा

अमित ठाकरेंशी संवाद; काही जणांची एकाधिकारशाही
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी चिपळुणात गुहागर, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी झालेल्या बैठकीत तिन्ही तालुक्यांतील नाराज पदाधिकाऱ्यांनी आपली व्यथा मांडली. त्यावर पक्षवाढीसाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन अमित ठाकरे यांनी केले.
राज्यातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे युवानेते अमित ठाकरे हे ५ ते ११ जुलैदरम्यान कोकण दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी ते चिपळुणात आले असताना त्यांनी नगर पालिकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर नगर पालिका ते बहादूरशेखनाकापर्यंत मोटाररॅली काढण्यात आली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही अभिवादन केले. याचवेळी डीबीजे महाविद्यालयातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर शहरातील अभिरूची हॉटेलच्या सभागृहात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
बैठकीला चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. आगामी कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या बैठकीच्या निमित्ताने आगामी निवडणुकीसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आवाहन अमित ठाकरे यांनी केले.
...
चौकट
एकत्रितपणे पक्षकार्य करण्याचे आवाहन
दरम्यान, या बैठकीत मनसेतील काही नाराज पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्यासमोरच आपली नाराजी व्यक्त केली. पक्षात काहीजणांची एकाधिकारशाही सुरू आहे. त्यामुळे पक्ष आणि संघटना विस्तारण्यात अडचणी येत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर अमित ठाकरे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत यापुढे एकत्रितपणे पक्षकार्य करण्याचे आवाहन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75425 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top