
२
-rat8p20.jpg
34525
ः साखरपा ः दुर्घटनाग्रस्त घराचा पंचनामा करताना तलाठी संतोष मोघे.
-------------
देवळेत घराचे छप्पर कोसळून
अडीच लाखांचे नुकसान
साखरपा ः देवळे येथे पावसामुळे घराचे छत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बाजारपेठ परिसरात रहाणारे विजय वसंत साडविलकर यांच्या घराचे छत अचानक कोसळले. साडविलकर यांचे घर हे कच्चे मातीचे आहे. अतिवृष्टीमुळे छताचे वासे आणि कौले कोसळून छत कोसळले. त्यांच्या घरात सात माणसे राहतात. ही सगळी माणसे बाजूच्या खोलीत झोपली असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताविषयी समजताच उपसरपंच शिंदे, पोलिसपाटील सुजित साळवी, तलाठी कोतवाल संतोष गावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्रभारी तलाठी संतोष मोघे यांनी पंचनामा केला. या अपघातात २ लाख ५२ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचे तलाठी मोघे यांनी पंचनाम्यात नमूद केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75434 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..