पान दोन मेन-दोडामार्गात अनेक गाव संपर्कहीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान दोन मेन-दोडामार्गात अनेक गाव संपर्कहीन
पान दोन मेन-दोडामार्गात अनेक गाव संपर्कहीन

पान दोन मेन-दोडामार्गात अनेक गाव संपर्कहीन

sakal_logo
By

L34628

- खानयाळे ः येथील शिरंगे पुलावर पाणी आलेले पाणी.
L34629

ओळ - केर ः गावठाण येथील मोरी पाण्याखाली गेली.
L34630

ओळ - झरेबांबर ः पुलावर पाणी वाहत असलेले पाणी.
L34631

ओळ - पिकुळे ः साटेली भेडशी ते उसप पिकुळे मार्गावरील पूल पाण्याखाली गेले होते.
L34632

ओळ - वानोशी ः मणेरी कुडासे दरम्यानचा मार्गावरील वानोशी येथील पुलावरही पाणी आले होते.

L34633
टीपः swt८२९.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - परमे ः येथील पूल पाण्याखाली गेले होते.
L34634

ओळ - उसप ः मांगेली धबधब्यावर जाणाऱ्या खोक्रल उसप मार्गावरील अर्धवट कामामुळे रस्त्याची झालेली अवस्था.
L34635

ओळ - दोडामार्ग ः एनडीआरएफची टीम दोडामार्गात दाखल झाली.


दोडामार्गात अनेक गाव संपर्कहीन
पूल पाण्याखाली ः नदी-नाले तुडुंब
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ८ : सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यांतील नदी नाले तुडुंब भरले आहेत. अनेक ठिकाणी छोटे छोटे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्या मार्गावरील वाहतूक बंद पडल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.
गेले चार पाच दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. रेड अलर्ट जाहीर झाला आहे. तालुक्यांतील तिलारी धरण भरले आहे. धरणाची पाण्याची पातळी सकाळी सात वाजता १०६.४० मीटर एवढी होती. तिलारी नदीची पातळी ३८.३० आहे तर इशारा पातळी ४१.६० आहे. गेल्या चोवीस तासात त्या परिसरात ७०.६० पाऊस पडला तर एकूण पावसाची नोंद १२१०.६० एवढी आहे.
पावसाचा जोर वाढतो आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. एनडीआरएफची टीम आज दोडामार्गमध्ये दाखल झाली आहे. त्यांनी पणतुर्ली येथे रस्त्यात पडलेली झाडे व फांद्या तोडून मार्ग मोकळा करण्यास सुरवातही केली आहे.

दोडामार्ग-आयी मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक बंद होण्याचे, विस्कळित होण्याचे प्रकार घडले आहेत. साटेली भेडशी ते शिरंगे मार्गावरील खानयाळे येथील छोटा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक आणि जनजीवन विस्कळित झाले. साटेली भेडशी ते परमे मार्गावरील परमे येथील छोटा पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावर लाकडाचे ओंडके अडकले होते. ते जेसीबीने हटवून अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केला. झरेबांबर उसप, पिकुळे मार्गावरील झरेबांबर येथील पूलही पाण्याखाली गेला आहे. तर उसप, पिकुळेला जाण्यासाठी साटेली भेडशी येथून असलेल्या मार्गावरील भंडार पुलावर देखील पाणी आल्याने उसप, पिकुळेकडे जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. मणेरी कुडासे वानोशी मार्गे साटेली भेडशीकडे जाणाऱ्या मार्गावर वानोशी येथे पुलावर पाणी आल्याने त्या मार्गावरील वाहतूक बंद होती. घोटगेवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने नवा पूल उभा राहिल्याने केर, मोर्ले आणि घोटगेवाडी येथील लोकांचे तेथील पूल सतत पाण्याखाली जात असल्याने अनेक पिढ्या हाल होत होते, ते नव्या पुलामुळे आता संपले आहेत. त्यांना दिलासा मिळाला असला तरी केर गावठाण येथील पूल पाण्याखाली गेल्याने केरवासीयांचे हाल झाले.
....
तर अपघाताचा धोका
झरेबांबर उसप, पिकुळेमार्गे खोक्रल येथून मांगेली धबधब्यावर जाणाऱ्या मार्गावर खोक्रल पुलानजिक सुरू असलेले रुंदीकरणाचे काम ठेकेदाराने अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे मूळ रस्ता आणि संरक्षक भिंत यामध्ये मोठा चर पडल्याने त्या चरात पडून वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना अपघात होवून जीवित किंवा वित्तहानी होवू शकते. त्याकडे आपत्ती नियंत्रण कक्ष आणि प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
---------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75439 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..