
२ वा ५
गुहागरमध्ये अतिवृष्टीने ५ लाखांचे नुकसान
धोपावे मार्गावरील दरड हटवली; वीज पुरवठा खंडित
गुहागर, ता. ८ः तालुक्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ८ घरांचे ५ लाख ७७ हजार ७७० रुपयांचे नुकसान झाले आहे. वेलदूर नवानगरमार्ग धोपावे रस्त्यावर पडलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजूला केल्याने रस्ता पूर्ववत झाला आहे.
महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तालुक्यातील विविध गावात खंडित झालेला विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तालुक्यात गेल्या ४ दिवसात अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वित्तहानी झाली. काजुर्ली येथील मिलिंद रेवाळे यांच्या घराचे संपूर्ण छप्पर उडाल्याने २ लाख ३३ हजार ३२० रुपयांचे नूकसान झाले. दत्ताराम जगताप यांच्या घराशेजारील आंबाकलमाचे १० हजार तर घराचे पत्रे उडाल्याने रु. ३ हजाराचे, दोडवली येथील आश्विनी जाधव यांच्या घरावर वीज पडल्याने घराचे पत्रे व दरवाजाचे ७ हजार २०० रु., खोडदे निवातेवाडी येथील संतोष निवाते याच्या घराचे छप्पर उडून ५२ हजार रु., खोडदे येथील सुरेश निकम यांच्या घराचे छप्पर उडून २४ हजार ७०० रु., निगुंडळ येथील संदीप नानीसकर यांचा गोठा कोसळून ३५ हजार तर सर्वाधिक शिर येथील मिलिंद गोरिवले यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून २ लाख ९ हजार ५० रुपयांचे नुकसान झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75445 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..