रत्नागिरी ः जिल्ह्यात प्रत्येक घरी उभारला जाणार राष्ट्रध्वज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जिल्ह्यात प्रत्येक घरी उभारला जाणार राष्ट्रध्वज
रत्नागिरी ः जिल्ह्यात प्रत्येक घरी उभारला जाणार राष्ट्रध्वज

रत्नागिरी ः जिल्ह्यात प्रत्येक घरी उभारला जाणार राष्ट्रध्वज

sakal_logo
By

जिल्ह्यात प्रत्येक घरी उभारला जाणार राष्ट्रध्वज

निवासी उपजिल्हाधिकारी; ११ ते १७ ऑगस्ट, प्लास्टिकचे ध्वज न वापरण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाने अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीमध्ये देशभरात हर घर झेंडा हा उपक्रम राबवण्याचे निश्चित केले आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी केले.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. ८) बैठक झाली. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसाई, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणा, खासगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, रुग्णालये, सहकारी संस्था व नागरिकांनी आपल्या घरावर तसेच इमारतीवर ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज उभारावयाचा आहे.
...
चौकट
विक्री केंद्र उभारणार
राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशिनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादीपासून बनवलेल्या कापडाचे असावेत. प्लास्टिकचे ध्वज वापरू नयेत. हे राष्ट्रध्वज आस्थापना तसेच नागरिकांनी विकत घ्यावयाचे असून त्यासाठी विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75453 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..