उदय सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदय सामंत
उदय सामंत

उदय सामंत

sakal_logo
By

शिवसेनेचे चिन्ह काबीज करण्याचा
ुमुख्यमंत्री शिंदेंचा हेतू नाही : सामंत
मुंबई ता. ८ : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ आणि पक्ष काबीज करण्याचा कोणताही हेतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाही. मी स्वत: गुवाहाटीत मुख्यमंत्र्यांबरोबर होतो, पण त्यांचा असा कोणताही हेतू मला दिसला नाही, असे वक्तव्य माजी मंत्री उदय सामंत यांनी आज केले.
श्री. सामंत म्हणाले, की आता शिंदे गटाची म्हणजेच शिवसेनेची भाजपशी युती झाली आहे, त्यामुळे आता केवळ आमच्या आमदारांचे मत जाणून घेण्याशिवाय भाजपची संमतीही घ्यावी लागेल. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि भाजपच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी पुढे यावे.
सामंत म्हणाले, की अलीकडच्या घडामोडींवर नजर टाकली तर विधिमंडळाशी संबंधित काही निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.
या कारणास्तव विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या आणि फ्लोअर टेस्ट घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. पण, माझ्या बिलांवर सही का झाली नाही? मी मंत्री असताना राज्यपालांना याबाबत वारंवार विचारणा केली होती. मला विचारल्यावर राज्यपालांनी माझे बिल राष्ट्रीयकडे पाठवले. पण, एखादे विधेयक तुम्हाला आवडले नाही तर ते राष्ट्रपतींकडे पाठवावे, अशी पद्धत नाही. तरीही राज्यपालांनी या वेळी जे काही केले आहे, ते नियमानुसार केले असावे, असे मला वाटते.
---
रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय
​​​​​​​सामंत म्हणाले, की सत्तेत आल्यावर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय सुरू असल्याचे सांगितले. मात्र, ‘पीपीपी मॉडेल’मुळे रत्नागिरीचे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात नाही. माझ्या या माहितीनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला आवश्यक त्या सूचना दिल्या. आता पुढील वर्षापासून रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. या प्रकाराची माहिती माजी मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75527 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top