
६ मेन
राज्यातील पहिलीच यंत्रणाः लोगो
....
काल फोटो सोडला
rat8p30.jpg
34596
-रत्नागिरी- जिल्हाधिकारी बी. एन. पाटील.
...
-rat8p31.jpg
34597
-प्रणालीची माहिती देताना अजय सूर्यवंशी.
------------
उद्घोषणा देणार आपत्तीचा पूर्वसंदेश
जिल्हा प्रशासनाने यंदा पूर्ण तयारी; पूर, दरडप्रवण भागात सतर्कता, वित्त व जीवितहानी टाळता येणार
रत्नागिरी, ता. ८ ः जिल्हा प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीदरम्यान नागरिकांना पूर्वसंदेश देणारी आणि दरडप्रवण भागात गावकऱ्यांना सतर्क करणारी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कार्यन्वित केली आहे. वीजपुरवठा असो नसो, बॅटरीवर सलग तीन दिवस ही प्रणाली चालू शकते. एका ठिकाणावरून जिल्ह्यासह आपद्ग्रस्त ४०६ गावांना या यंत्रणेद्वारे संदेश देता येतो. जगबुडीला येणाऱ्या पुराची २ तासांपूर्वीची सूचना या यंत्रणेद्वारे दिली गेली. यामुळे नैसर्गिक आपत्तीतील वित्त व जीवितहानी टाळता येणार आहे. राज्यातील ही पहिलीच प्रणाली असल्याचा दावा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केला.
निसर्गाच्या अवकृपेने जिल्ह्यात गेल्या वर्षी महापूर आणि दरडी कोसळण्याच्या मोठ्या घटना घडल्या. या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रंचड वित्त व जीवितहानी झाली. अचानक निर्माण झालेल्या या संकटाला तोंड देताना जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणांची दमछाक झाली. पूर्वतयारी नसल्याने मदतकार्यालाही उशिर झाला आणि अनेकांना प्राण गमवावे लागले. चिपळूण, खेड शहरात शंभर वर्षांत पहिल्यांदा एवढे पाणी भरले. गेल्या वर्षीचा हा भयंकर अनुभव गाठिशी असल्याने आणि भविष्यात या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागणार असल्याने जिल्हा प्रशासनाने यंदा पूर्ण तयारी केली आहे. वाशिष्ठीचा गाळ काढल्यामुळे यंदा पूर परिस्थिती उद्भवली नाही. खेडमध्ये जगबुडीला येणाऱ्या पुराची पूर्वसूचना रिअल टाईम डाटा अॅक्विजिशन सिस्टीम (आरटीडीएएस) या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे देण्यात आली. आता तर सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली विकसित केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हा परिषद आणि पोलिस दलाकडे याचे नियंत्रण राहणार आहे.
..
चौकट
४०६ गावांमध्ये कार्यान्वित
चिपळूण, खेड, राजापूर, दापोली आदी भागातील ४०६ गावांमध्ये ही कार्यान्वित केली आहे. नैसर्गिक आपत्तीबाबत काही सूचना असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातून हा संदेश सर्वांना दिला जाते तसेच ४०६ गावांमधील ग्रामपंचायत किंवा सरपंचाकडे ही यंत्रणा आहे. त्यांना सूचना मिळतेच; परंतु तिथे काही मदत हवी असल्यास किंवा नैसर्गिक आपत्ती ओढावली असल्यास ते तेथून मदतीसाठी संदेश देऊ शकतात. माईकबरोबर मोबाईलवरूनही संदेश, सूचना देता येते. दोन्ही बाजूंनी संपर्क करता येणारी राज्यातील ही पहिली प्रणाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75534 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..