३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३

sakal_logo
By

सावर्डे विद्यालयात विज्ञानछंद
मंडळाची झाली स्थापना
चिपळूण, ता. ९ः विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधनवृत्ती जोपासली जावी. परिसरातील विविध नैसर्गिक घटकांचे निरीक्षण करून त्याचा अभ्यास करण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी, या उद्देशाने सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञानछंद मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. पाचवी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना विज्ञानछंद मंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. या मंडळामार्फत लोकसंख्या वाढ जनजागृती, पर्यावरणदिन, ओझोनदिन, टाकाऊ पदार्थांपसून राखी तयार करणे स्पर्धा, राष्ट्रीय विज्ञानदिन, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, शास्त्रज्ञांच्या जयंती, विज्ञानप्रदर्शन, दैनंदिन अध्ययनासाठी शैक्षणिक साहित्य तयार करणे, या उपक्रमावर वर्षभर काम करण्याचे निश्चित करण्यात आले. या मंडळात अथर्व नांदिवडेकर अध्यक्ष, प्रणव गायकवाड सचिव, सानिका वारे खजिनदार, आर्या नांदिवडेकर हस्तलिखित प्रमुख या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक उद्धव तोडकर, दिलीप डंबे, अजय सूर्यवंशी, वर्षा चव्हाण, श्रेया राजेशिर्के, कविता हळदिवे, शामल म्हादे, यामिनी महाडिक उपस्थित होते. मुख्याध्यापक रफिक मोडक, उपमुख्याध्यापक विजय काटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75556 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..