
शिलक
rat८p१६.jpg
L34521
चिपळूण ः नवनिर्वाचित सरपंच सुरेखा बोलाडे यांनी निवडीचे पत्र देताना नायब तहसीलदार तानाजी शेजाळ.
-------------
कोळकेवाडीच्या सरपंचपदी बोलाडे
चिपळूण ः तालुक्यातील कोळकेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा बोलाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी सरपंच पल्लवी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी काम पाहिले. कोळकेवाडी ग्रामपंचायतीच्या गतवर्षी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने ११ पैकी ६ जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. सरपंचपदी महिला आरक्षण असल्याने पल्लवी शिंदे यांना सरपंचपदाची पहिली संधी देण्यात आली होती. दरम्यान, त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने शिंदे यांनी राजीनामा दिला होता. गेली दोन महिने प्रभारी सरपंच म्हणून सचिन मोहिते यांनी काम पाहिले. दरम्यान, सोमवारी (ता. ४) नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत सरपंचपदाची निवडणूक झाली. या पदासाठी केवळ सुरेखा बोलाडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वांना विश्वासात घेत ग्रामपंचायतीचा कारभार लोकाभिमुख करण्याची ग्वाही नवनिर्वाचित सरपंच बोलाडे यांनी दिली. या वेळी माजी सरपंच पल्लवी शिंदे, उपसरपंच सचिन मोहिते, प्रकाश कदम, ग्रामविकास अधिकारी मंगेश पिंगळे, श्रीकांत निगडे, सरिता राणे, सुनीता वरक, माजी सरपंच नीलेश कदम, रमेश बंगाल आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75565 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..