
वेंगुर्ले रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुनील रेडकर
swt९११.jpg
३४७४०
सुनील रेडकर, पंकज शिरसाट, राजू वजराटकर, नितीन कुलकर्णी
वेंगुर्ले रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुनील रेडकर
शंकर वजराटकर उपाध्यक्ष; साई डिलक्स हॉल येथे उद्या पदग्रहण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ९ ः रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ले मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सुनील रेडकर यांची २०२२-२३ या वर्षासाठी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी शंकर उर्फ राजू वजराटकर, सचिवपदी पंकज शिरसाट, तर खजिनदार म्हणून नितीन कुलकर्णी यांची निवड केली. क्लबचा वार्षिक पदग्रहण सोहळा सोमवारी (ता. ११) सायंकाळी ७ वाजता साई डिलक्स हॉल येथे होणार आहे.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे व इंस्टॉलिंग ऑफिसर म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ईलेक्ट नासीर बोरसदवाला, असिस्टंट गव्हर्नर दीपक बेलवलकर, असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर उपस्थित राहणार आहेत. वेंगुर्ले रोटरी क्लबची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणेः अध्यक्ष-सुनील रेडकर, सचिव-पंकज शिरसाट, उपाध्यक्ष-शंकर उर्फ राजू वजराटकर, खजिनदार-नितीन कुलकर्णी, तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टरसाठी क्लब सर्व्हिस-संजय पुनाळेकर, व्होकेशनल सर्व्हिस-राजन गावडे, पब्लिक इमेज-दिलीप गिरप, इंटरनॅशनल सर्व्हिस-राजेश घाटवळ, कम्युनिटी सर्व्हिस-सुरेंद्र चव्हाण, युथ सर्व्हिस-योगेश नाईक, रोटरी फाऊंडेशन- गणेश अंधारी, मेंबरशिप-सचिन वालावलकर, सर्व्हीस प्रोजेक्ट-पीटर रॉड्रिक्स, लिटरसी-आनंद बांदेकर, हायजीन व सॅनिटेंशन-नागेश गावडे, स्पोर्ट्स-अनमोल गिरप, टीच अँड विन-आशिष शिरोडकर व अजित धारगळकर, पोलिओ-वसंतराव पाटोळे, एडिटर- सदाशिव भेंडवडे व वसंतराव पाटोळे, सार्जंट ऑफ आर्म-आशुतोष मसुरकर व दिलीप शितोळे.
रोटरी वर्षात समाजाभिमुख विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून वेंगुर्ले तालुक्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या विविध व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. यामध्ये दिलीप गिरप (उत्कृष्ट नगराध्यक्ष नॅशनल अवॉर्ड), सेंद्रा फर्नांडिस (फॉरेन्सिक सायन्स गोल्ड मेडल), तेजस मेस्त्री (एमए गायन-गोल्ड मेडल), स्नेहा नार्वेकर (जलतरण विश्वविक्रम) व राजेंद्र निंबाळकर (चार्टर्ड प्रेसिडेंट, दोडामार्ग), तसेच रोटरी परिवारातील रो. राजेश घाटवळ (असिस्टंट गव्हर्नर२०२१-२२), विवेक शिरसाट- (जिल्हा परिषद गुणवंत कर्मचारी पुरस्कार), तन्वी शितोळे (उच्च माध्यमिक परीक्षेत विशेष प्राविण्य), अथर्व अंधारी (शालांत विशेष प्राविण्य), साईराज सामंत (उत्कृष्ट बॅडमिंटनपटू), आर्ची नाईक (सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च कांस्य पदक) यांचा समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75630 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..