वायंगणी-बौद्धवाडी पूल धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायंगणी-बौद्धवाडी पूल धोकादायक
वायंगणी-बौद्धवाडी पूल धोकादायक

वायंगणी-बौद्धवाडी पूल धोकादायक

sakal_logo
By

swt912.jpg
34741
वायंगणीः पाण्याखाली गेलेला बौद्धवाडी पूल.

वायंगणी-बौद्धवाडी पूल धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ९ः वायंगणी-बौद्धवाडी येथील नाल्यावरील पूल धोकादायक बनला असून, कमी उंचीमुळे कायम पाण्याखाली जात आहे. याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
वायंगणी-बौद्धवाडी, आचरा-हिर्लेवाडी जोडणारा दुवा म्हणून बौद्धवाडी येथील पूल महत्त्वाचा ठरत आहे; मात्र हा पूल जीर्ण झाला असून, कमी उंचीमुळे पावसाळ्यात वारंवार पाण्याखाली जातो. पुलावर मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या जागी नवीन पूल उभारण्याची येथील ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याचा फटका या भागातील ग्रामस्थांना पावसाळ्यात बसतो. थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जात ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. शासन, लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देत पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75631 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top