कृषिकन्यांतर्फे हिर्लोकमध्ये ''कृषी माहिती केंद्र'' सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषिकन्यांतर्फे हिर्लोकमध्ये ''कृषी माहिती केंद्र'' सुविधा
कृषिकन्यांतर्फे हिर्लोकमध्ये ''कृषी माहिती केंद्र'' सुविधा

कृषिकन्यांतर्फे हिर्लोकमध्ये ''कृषी माहिती केंद्र'' सुविधा

sakal_logo
By

swt94.jpg
34744
हिर्लोकः येथे कृषिकन्यांच्या वतीने कृषी माहिती केंद्र उभारण्यात आले.

कृषिकन्यांतर्फे हिर्लोकमध्ये
''कृषी माहिती केंद्र'' सुविधा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः तालुक्यातील हिर्लोक गावात उद्यानविद्या महाविद्यालय, मूळदेच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम राबवित आहेत. या कार्यक्रमांतर्गत ग्रुपग्रामपंचायत हिर्लोक-किनळोस येथे ''कृषी माहिती केंद्र'' उभारण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच कन्याश्री मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र राणे, प्रगतशील शेतकरी बाजीराव झेंडे, सुनील सावंत, विनोद सावंत, हिर्लोक विकास सोसायटी चेअरमन पंढरीनाथ सावंत, शिवाजी विद्यालय हिर्लोकचे माजी मुख्याध्यापक शाम सावंत, माजी मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेचे प्राध्यापक डॉ. देवारे, डॉ. उईके, डॉ. पालसांडे उपस्थित होते. माहिती केंद्राचे उद्घाटन सरपंच मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक अत्याधुनिक माहिती मिळणे, विद्यापीठाने विकसित केलेले नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतीविषयक समस्यांचे निराकरण, शेतीविषयक प्रात्यक्षिके, शेतीशाळा, कृषी मेळावे यांसारखे विविध उपक्रम राबविणे हा कृषी माहिती केंद्राचा उद्देश आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषिकन्या रसिका शेलार, साक्षी टिळेकर, रिद्धी दळी, रक्षिथा रेड्डी, कल्याणी मांडे, दीप्ती तुळसकर, तेजस्वी मिंड यांनी मेहनत घेतली. उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75634 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..