कल्पवृक्षाच्या पाना-फळांचा ''विठुराय'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्पवृक्षाच्या पाना-फळांचा ''विठुराय''
कल्पवृक्षाच्या पाना-फळांचा ''विठुराय''

कल्पवृक्षाच्या पाना-फळांचा ''विठुराय''

sakal_logo
By

swt97.jpg
34747
दोडामार्गः केर, मोर्ले गावातील महिलांनी कल्पवृक्षाची पाने व फळांपासून साकारलेला ‘विठुराय’.

कल्पवृक्षाच्या पाना-फळांचा ‘विठुराय’
माध्यमांतून कौतुक ः केर, मोर्लेतील महिलांची कल्पकता
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ९ः दोडामार्ग तालुक्यातील केर आणि मोर्ले या गावातील महिलांनी एकत्र येऊन कल्पवृक्षाच्या पानांचा आणि फळांचा वापर करून ''विठुराय'' साकारला आहे. या अनोख्या निसर्गवारीतून त्यांचे निसर्गाबद्दलचे प्रेम आणि विठोबाचे दर्शन घडविले आहे. आषाढी एकादशीनिमित्त हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या निसर्गवारीचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय बनला आहे.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना देखील महत्त्व आहे, याची जाणीव करून देणारा संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय होय. वारीत स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब असा भेदाभेद नसतो. सर्वजण एक होऊन विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होतात. वारी म्हणजे भक्तीचा महासागर आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. भक्तिसागरात डुंबून, मनातील सर्व शीण दूर करून विठ्ठलाला डोळे भरून पाहण्यासाठी भक्ताची चाललेली धडपड म्हणजे वारी. वारींमध्ये पुरुषांबरोबरच महिलांचाही सहभाग, उत्साह उल्लेखनीय असतो. याच उत्साहातून वर्षाचे अकरा महिने घर, संसार, चूल, मूल, शेत आणि व्यवसाय सांभाळणाऱ्या केर आणि मोर्लेतील स्त्रियांनी माडाची पाने आणि फळांपासून विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे. या निसर्गवारीची मूळ संकल्पना श्रीरंग चॅरिटेबलचे डॉ. सुमित पाटील यांची असून, त्यांनी या वारीच्या छायाचित्रणाचे दिग्दर्शन केले आहे. मिलिंद आडेलकर यांनी या वारीचे चित्रीकरणही केले आहे. डॉ. प्रणव प्रभू यांनी लेखन आणि उदय सबनीस यांनी आपल्या भारदस्त आवाजात या वारीचे विश्लेषण केले आहे. किशोर नाईक, संकेत ठाकूर, विजय वालावलकर, योगेश राजे भोसले, गौरेश राणे, वैभव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75637 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..