हर्णै ःअॅड. बाळासाहेब बेलोसेंना महाविद्यालयात आदरांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै ःअॅड. बाळासाहेब बेलोसेंना महाविद्यालयात आदरांजली
हर्णै ःअॅड. बाळासाहेब बेलोसेंना महाविद्यालयात आदरांजली

हर्णै ःअॅड. बाळासाहेब बेलोसेंना महाविद्यालयात आदरांजली

sakal_logo
By

-rat९p६.jpg ः
34729
हर्णै ः ॲड. उदय बेलोसे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कोकण कृषी विद्यापीठातील प्रा. डॉ. रवींद्र देशपांडे.
----------------
बेलोसे हे कुशल संघटकही होतेः डॉ. देशपांडे

अॅड. बाळासाहेब बेलोसेंना महाविद्यालयात आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
हर्णै, ता. ९ ः ॲड. बाळासाहेब बेलोसे हे कुशल संघटक होते. त्यांनी दापोलीच्या विकासाची अनेक स्वप्ने पाहिली व त्या स्वप्नांना आकार दिला. बाहेरची माणसे दापोलीत आणली व येथील प्रचलित कार्यपद्धतीला ‘प्रोफेशनल टच’ दिला, असे उद्‍गार डॉ. रवींद्र देशपांडे यांनी काढले.
दापोली येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनच्या वराडकर-बेलोसे महाविद्यालयामध्ये ॲड. बाळासाहेब बेलोसे यांचा सातवा स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्लॅट बायोटेक्नॉलॉजी विषयाचे प्रा. डॉ. रवींद्र देशपांडे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह डॉ. दशरथ दाजीराव भोसले हे होते. या वेळी भोसले यांनी २ नोव्हेंबर हा दिवस वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचा ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असे जाहीर केले. २ नोव्हेंबर १९७३ ला कला व वाणिज्य महाविद्यालय दापोलीत सुरू करण्याचा संस्थेने संकल्प केला होता. त्याप्रमाणे सात-आठ महिन्यांच्या कालावधीतच म्हणजेच १ जुलै १९७४ ला प्रत्यक्षात कला आणि वाणिज्य महाविद्यालय सुरू केले. संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनीही या वेळी स्व. बाळासाहेब बेलोसे यांच्या कार्याचा गौरव करणारा संदेश पाठवून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाने डॉ. गणेश मांगडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी चाचणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात १०० पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची चाचणी केली. प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड, डॉ. सुरेश निंबाळकर, प्रा. डॉ. जयश्री गव्हाणे, सिद्राय शिंदे, उत्तम पाटील, विश्वंभर कमळकर, मधुमती थोरात आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75657 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..