सावंतवाडीवाडी बसस्थानकात अस्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीवाडी बसस्थानकात अस्वच्छता
सावंतवाडीवाडी बसस्थानकात अस्वच्छता

सावंतवाडीवाडी बसस्थानकात अस्वच्छता

sakal_logo
By

swt915.jpg
34767
सावंतवाडीः आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना निवेदन देताना राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचे पदाधिकारी.

सावंतवाडीवाडी बसस्थानकात अस्वच्छता
आगार व्यवस्थापक धारेवरः शिवाजी चौक मंडळाकडून कार्यवाहीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः येथील बसस्थानकातील अस्वच्छता व चिखलमय परिस्थिती संदर्भात राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना जाब विचारत धारेवर धरले. येत्या सोमवारपर्यंत बस स्थानकाची स्वच्छता करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दोन दिवसांत सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन श्री. बोधे यांनी दिले.
येथील नव्या बसस्थानकाचे काम सुरू असल्याने जुन्या बसस्थानकाकडे संबंधित प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. येथील वेंगुर्ले बसस्थानक तसेच सावंतवाडी बसस्थानकामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहाची दुर्दशा झाल्याने प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेले कित्येक दिवस याकडे प्रशासनाची डोळेझाक होत असल्याचे लक्षात येतात आज राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत आगार व्यवस्थापकांना धारेवर धरले. यावेळी विजय पवार, सुरेश भोगटे, दीपक सावंत, विलास जाधव, रवी जाधव, उमेश खटावकर, तुकाराम कासार आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत स्थानक परिसरात पडलेले खड्डे बुजविण्याबरोबरच स्वच्छतागृहाची झालेली दुर्दशा सुधारावी, प्लॅटफॉर्ममध्ये झालेला चिखल आदी विविध प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर फिरून वस्तुस्थितीची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली. दरम्यान, स्थानक परिसरातील अस्वच्छता व चिखलमय परिस्थितीची समस्या येत्या दोन दिवसांमध्ये मार्गी लावण्यात येईल. तसेच वरिष्ठ पातळीवरून प्रस्ताव मंजूर करून परिसरात पडलेल्या खड्ड्यांबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन श्री. बोधे यांनी यावेळी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75683 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top