
चिपळूण ः काय ते खड्डे, काय तो महामार्ग, काय तो घाट
- rat9p3.jpg
L34734
चिपळूण ः महामार्गावर पडलेले खड्डे.
-------------
काय ते खड्डे, काय तो महामार्ग, काय तो घाट!
राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बिकट; खड्ड्यांमुळे चालक, पादचारी हैराण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सेवा रस्त्यांवरील खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. परशुराम घाटात सातत्याने पडत असलेल्या दरडींमुळे हा घाट धोकादायक बनला आहे, तर कुंभार्ली घाटातदेखील दरडी कोसळत आहेत. एकंदरीत, खड्डे व दरडींमुळे ‘काय ते खड्डे, काय तो महामार्ग, काय तो घाट!’ म्हणण्याची वाहनचालकांसह नागरिकांवर वेळ आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून परशुराम ते खेरशेतपर्यंतच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम संथ गतीने सुरू आहे. याबाबत सर्वसामान्यांमधून सातत्याने ओरड होत राहिली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असताना वालोपे रेल्वे स्टेशन ते सावर्डेपर्यंत काही मार्गांवर सेवा रस्ते तयार केले आहेत. या रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली असून या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने निकृष्ट रस्ते तयार केले असल्याचे समोर आले; मात्र पावसाळ्यात या खड्डेमय सेवा रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण बनले आहे. या मार्गावर किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असताना डोंगरकटाई व सपाटीकरणाचे काम झाले आहे. या मार्गावर दरडी कोसळलेल्या पाहता केलेल्या उपाययोजना तकलादू ठरल्या.
...
चौकट
कापसाळ येथे महामार्गावर पाणी
चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना पाणी निचरा व्यवस्थापन व्यवस्थित न केल्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात डीबीजे कॉलेज परिसर व बहादूरशेख नाका येथे तलाव तयार झाल्याचे पाहावयास मिळाले. या मार्गावरून वाहन चालवणे जिकिरीचे बनले होते. हीच परिस्थिती कधी नव्हे, ते कापसाळ येथे महामार्गावर पाणी साचल्याचे समोर आली. या पाण्यातूनच चालकांना वाहने चालवावी लागली. यातून ठेकेदार कंपनीने पाणी व्यवस्थापनाबाबत केलेले नियोजन फसल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरील खड्डे अथवा घाटांमधील दरडी पाहता ‘काय ते खड्डे, काय तो महामार्ग, काय तो घाट!’ म्हणण्याची वेळ आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75692 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..