रत्नागिरी- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त
रत्नागिरी- संक्षिप्त

रत्नागिरी- संक्षिप्त

sakal_logo
By

कामगार कल्याणतर्फे
समरगीत स्पर्धा
रत्नागिरी ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूणअंतर्गत रत्नागिरी कामगार कल्याण केंद्रातर्फे गटस्तरीय समरगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. गेली दोन वर्षे कोविड-१९च्या काळात ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. स्पर्धेत रत्नागिरीतील औद्योगिक कामगार कलावंत उत्साहाने सहभागी होतात. या वर्षी स्पर्धेमध्ये कामगार कलावंतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कामगार कल्याण केंद्र रत्नागिरीतर्फे केले आहे. समरगीत संघामध्ये कमीत कमी ८ व जास्तीत जास्त १२ कलावंत वादक साथीदारांसह असावेत, सहभागी कलावंताचा पेहराव एकसारखा असावा, वादक साथीदार वगळता उर्वरित संघ कलावंतांपैकी ५० टक्के कलावंत हे मंडळाचा लिंक नंबर धारण केलेले असावेत. सहभागी कलावंत हे १८ वर्षे वयोगटापुढील असावेत. अधिक माहितीसाठी येथील कामगार कल्याण केंद्राशी संपर्क साधावा.
------------
आवाशीत शैक्षणिक
साहित्याचे वाटप
गावतळे ः दापोली तालुक्यातील आवाशी शाळा नं. १ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे माजी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक शांताराम शेडगे यांच्यातर्फे दप्तर, वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्यांचे मान्यवरांच्या हस्ते नुकतेच वाटप झाले. या वेळी उपसरपंच विनोद शेडगे, अनंत वाडकर, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राजक्ता शेडगे आदींनी मनोगते व्यक्त केली. या वेळी विनोद शेडगे यांनी शांताराम शेडगेंच्या योगदानाबद्दल कौतुक केले. स्वागत पदवीधर शिक्षक, प्रकाश कांबरे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश पाटील यांनी केले. जिल्हा परिषद शाळा म्हणजे गावाच्या प्रगतीमधील चेतना केंद्र असल्याचे अध्यक्षा प्राजक्ता शेडगे यांनी सांगितले. या वेळी पालक सद्दाम शेख, निलम वाडकर, ज्योती पडवेकर, मानसी पडवेकर, संजय गुडले व विद्यार्थी उपस्थित होते.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75693 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..