खेड ः आमदार योगेश कदम यांनी भाजपच्या खेड शहर कार्यालयाला भेट दिली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः आमदार योगेश कदम यांनी भाजपच्या खेड शहर कार्यालयाला भेट दिली
खेड ः आमदार योगेश कदम यांनी भाजपच्या खेड शहर कार्यालयाला भेट दिली

खेड ः आमदार योगेश कदम यांनी भाजपच्या खेड शहर कार्यालयाला भेट दिली

sakal_logo
By

५ मेन शेजारी घ्यावी
--------
rat९p२३.jpg
३४७९५
ः खेड ः महामार्गावरील उधळेनजीक भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार योगेश कदम यांची भेट घेतली.
--------
rat९p२४.jpg
३४७९६
ः आमदार योगेश कदम यांनी खेड शहरातील भाजपच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी भाजपा पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. (सिद्धेश परशेट्ये ः सकाळ छायाचित्रसेवा)
--------
आमदार कदम भाजपच्या खेड कार्यालयात

कार्यकर्त्यांकडून स्वागत; युती सरकारच्या विजयाच्या घोषणा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ ः दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज ता. ९ रोजी पहिल्यादांच खेड तालुक्यात भेट दिली. या वेळी शिवसेनेसह भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. कशेडी येथून खाली आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह खेडच्या दिशेने निघाले, त्या वेळी उधळे येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी राजूभाई रेडीज यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांचे स्वागत केले. तद्नंतर आमदार कदम यांनी खेड शहरातील सोनारआळी येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी भाजपच्यावतीने जिल्हा सरचिटणीस संजय बुटाला, शहराध्यक्ष अनिकेत कानडे, वैजेश सागवेकर, रोहन राठोड, माधव जोशी, उदय खेडेकर, प्रवीण चव्हाण, मिलींद शिंदे, विकास तांबे, भूषण काणे, खालिद परकार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी शिवसेना-भाजपा युती सरकारचा विजय असो, अशा घोषणांनी भाजप कार्यालय परिसर दुमदुमून गेले.
...
चौकट
पुन्हा एकदा महाराष्ट्रात युतीचे सरकार
२०१९ नंतर जवळपास अडीच-तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्याने खऱ्‍या अर्थाने हा विजयोत्सव आहे, असे मत या वेळी भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी संजय बुटाला यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75724 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..