रत्नागिरी ः व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणाली पहिल्याच दिवशी हॅंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणाली पहिल्याच दिवशी हॅंग
रत्नागिरी ः व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणाली पहिल्याच दिवशी हॅंग

रत्नागिरी ः व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणाली पहिल्याच दिवशी हॅंग

sakal_logo
By

व्हॉट्सअॅप चॅटबॉटः लोगो
...
वापरकर्ते अपेक्षेहून अधिक;
प्रणाली करावी लागली सुधारित

पहिल्याच दिवशी हॅंग; २२ हजार लोकांनी वापरली, ६ तास काम करून सुधारणा
रत्नागिरी, ता. ९ ः जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील सर्व बाबींची माहिती देणाऱ्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणाली पहिल्याच दिवशी हॅंग झाली. जास्तीत जास्त १८ हजार लोक त्याचा वापर करतील, अशी अपेक्षा होती; मात्र २२ हजार लोकांनी या प्रणालीचा वापर केल्याने ती हॅंग झाली; मात्र जिल्हा नियंत्रण कक्ष आणि अन्य अधिकाऱ्यांनी पहाटे ४ वाजेपर्यंत त्याच्यावर काम करून या प्रणालीची क्षमता वाढवली तसेच त्यामध्ये काही बदलही केले.
दोन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणालीचे उद्घाटन प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते झाले. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मेसेजचे पर्याय पाठवल्यास R१ ते R९ पर्यंत विविध माहितीची उपलब्धता असणार आहे. या स्वरूपाचा राज्यात हा पहिलाच उपक्रम आहे. दूरध्वनी क्रमांक न लागणे अथवा व्यस्त असणे यामुळे माहिती प्राप्त होणे शक्य होत नाही, अशा परिस्थितीत हा चॅटबॉट विविध प्रकारची माहिती मोबाईल देणार आहे. या प्रणालीच्या मदतीने प्रत्येक नागरिकास केवळ पर्जन्यमान नव्हे तर नदीची पाणीपातळी, वेधशाळेतर्फे जारी सूचना, जिल्ह्याबाबत जारी विशेष सूचना, आपत्कालीन स्थितीत संपर्क करावयाचे क्रमांक, रस्ते व वाहतूक, भरतीच्या वेळा, रत्नागिरी जिल्ह्याचा नकाशा तसेच वेळोवळी जारी महत्वाचे संदेश तत्काळ प्राप्त होण्यासाठी ही प्रणाली सुरू केली. त्यासाठी ७३८७४९२१५६ हा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. यावर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मेसेजचे पर्याय पाठवल्यास R१ ते R९ पर्यंत विविध माहिती उपलब्ध आहे.
..
चौकट
पहाटे चारपर्यंत काम
जास्तीत जास्त १५ हजार लोक याला मेसेज करतील. म्हणून त्याची क्षमता १८ हजार ठेवण्यात आली होती; मात्र पहिल्याच दिवशी २२ हजार लोकांनी मेसेज पाठवून माहिती घेतली. त्यात काही ईमेज साईज होत्या. त्याचा वापर जास्त झाल्याने रात्री उशिरा चॅटबॉट ही प्रणाली हॅंग झाली. अखेर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी पहाटे चारपर्यंत त्यावर काम केले. यामध्ये ईमेजपेक्षा मेसेज देता येईल का, किंवा अन्य पर्याय देण्यात आली. त्यानंतर क्षमता वाढवून २५ हजार करण्याचा निर्णय झाला. पहिल्यात दिवशी जास्त प्रतिसाद मिळाला; मात्र त्यानंतर ५०० ते १०० लोकांनी या प्रणालीचा वापर केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75742 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..