संगमेश्वर ः पाचांबे नेरदवाडीत वीज पडून गोठ्याला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर ः पाचांबे नेरदवाडीत वीज पडून गोठ्याला आग
संगमेश्वर ः पाचांबे नेरदवाडीत वीज पडून गोठ्याला आग

संगमेश्वर ः पाचांबे नेरदवाडीत वीज पडून गोठ्याला आग

sakal_logo
By

-rat9p25.jpg ः
34799
संगमेश्वर ः पाचांबे येथील या गोठ्यावर वीज पडून आतील जनावरे मृत्युमुखी पडली.

वीज पडून गोठ्याला लागलेल्या
आगीत १३ जनावरे मृत्युमुखी
---
पाचांबे- नेरदवाडीतील घटना; साडेअकरा लाखांचे नुकसान
संगमेश्वर, ता. ९ ः जनावरांच्या गोठ्यावर वीज पडून आतील सर्व १३ पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली. ही घटना काल (ता. ८) रात्री तालुक्यातील पाचांबे-नेरदवाडीत घडली. यात शेतकऱ्याचे ११ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, दुभती जनावरे डोळ्यांदेखत हातची गमावल्याने त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाचांबे- नेरदवाडीतील शेतकरी संजय जाधव यांच्या जनावरांच्या गोठ्यावर काल रात्री साडेअकराच्या सुमारास वीज पडली. गोठ्यापासून जाधव यांचे घर १०० मीटर अंतरावर आहे. यामुळे त्यांना जवळच वीज पडल्याचा आवाज आला. मात्र, मुसळधार पाऊस सुरू असल्याने पुढील प्रसंगाची कल्पना आली नाही. गोठ्यात सुके वैरण असल्याने ही आग अचानक भडकली आणि जनावरे होरपळली. जाधव यांच्या लक्षात ही बाब येईपर्यंत खूप उशीर झाला होता. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. या आगीत गोठ्यातील सर्वच्या सर्व १३ जनावरे जागीच मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात आले. यात सहा मोठ्या म्हशी, तीन लहान म्हशी, दोन रेडे आणि दोन वासरांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच, सरपंच संदेश घाडगे, पोलिसपाटील राकेश सावंत, ग्रामसेवक बजरंग हराळे, तलाठी व्यवहारी, मंडल अधिकारी राजवाडे यांनी आज घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. काल रात्री वीज पडून गोठ्याला आग लागल्याचे या पंचनाम्यात नमूद करण्यात आले असून, संजय जाधव यांचे ११ लाख ५० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती ग्रामसेवक बजरंग हराळे यांनी दिली. दरम्यान, आज पशुसंवर्धन विभाग आणि वन विभाग यांच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
-------------
चौकट
दुग्ध व्यवसाय करणार कसा?
संजय जाधव हे शेतकरी असून, ते दुग्ध व्यवसाय करतात. याच जनावरांच्या जोरावर ते हा व्यवसाय करीत होते. मात्र, एका आगीत जनावरे मृत्युमुखी पडल्याने आणि गोठाही खाक झाल्याने आता करायचे तरी काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
-----------
चौकट
आमदार शेखर निकम यांची भेट
घटनेची माहिती मिळताच आमदार शेखर निकम यांनी घटनास्थळाला भेट दिली. पाहणी केल्यावर त्यांनी तातडीने जाधव यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला. तसेच, शासकीय पातळीवर जाधव यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75765 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..