राणेंचे केंद्रातले मंत्रिपद जाईल - विनायक राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणेंचे केंद्रातले मंत्रिपद जाईल - विनायक राऊत
राणेंचे केंद्रातले मंत्रिपद जाईल - विनायक राऊत

राणेंचे केंद्रातले मंत्रिपद जाईल - विनायक राऊत

sakal_logo
By

swt928.jpg

सावंतवाडीः खासदार विनायक राऊत पत्रकार परिषदेत बोलताना शेजारी अन्य.

राणेंचे केंद्रातले मंत्रिपद जाईल
विनायक राऊतः शिवसेनेला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निष्क्रिय मंत्री असल्याचे केंद्रातील नेत्यांचे मत बनले आहे. त्यामुळे त्यांचे लवकरच मंत्रिपद जाईल. मुलाला पालकमंत्रीपद मिळेल म्हणून त्यांना स्वप्न पडत असले, तरी आमदार दीपक केसरकर यांच्यामुळे तीही संधी हुकण्याची शक्यता आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. राणे यांनी शिवसेनेला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
खासदार राऊत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी गौरीशंकर खोत, आप्पा पराडकर, प्रदीप बोरकर, अरुण दुधवडकर, सतीश सावंत, संदेश पारकर, रुपेश राऊळ, जान्हवी सावंत, विक्रांत सावंत आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री राणे यांनी सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषदेत शिवसेनेवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांना विचारले असता ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘केंद्रीय मंत्री राणे यांचे दुकान आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. केंद्रातील नेते त्यांच्याबाबत नाराज असल्याने त्यांचे मंत्रिपद जाईल. राज्यात मुलाला पालकमंत्रिपद मिळेल, अशा अपेक्षेने ते वावरत होते; मात्र आमदार केसरकर यांच्यामुळे तीही संधी हुकेल.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना मोठे केले; पण ते गद्दार, बेईमान, कृतघ्न निघाले. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. उलट उर्वरित आयुष्य सुख समाधानकारक घालविण्यासाठी आता तोंड बंद ठेवावे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, धनुष्यबाण आहे. त्यामुळे तो कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह दिलेले आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह दिलेले आहे. त्यामुळे याबाबत प्रश्न निर्माण झाल्यास किंवा आयोगाने प्रश्न उपस्थित केल्यास कायदेशीर पूर्तता करून धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शिंदे गट स्वतःची पापे झाकण्यासाठी कोणाला तरी टार्गेट करत आहे. खासदार संजय राऊत यांनाही टार्गेट केले जात आहे. ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली, त्यांना पुन्हा शिवसेनेत संधी नाही.’’
खासदार राऊत म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात शिवसेना एकच आहे आणि तिच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचा विडा भाजपने बंडखोर गटाकडे दिला आहे. त्यामुळे ते बरळत आहेत. आमदार केसरकर, आमदार उदय सामंत यांना जनता ओळखून आहे. आमदार केसरकर यांच्या विपर्यास वर्तनाला शिवसेना भीक घालत नाही. आमदार केसरकरांना पहिल्या टप्प्यामध्ये मंत्रिपद व पालकमंत्री पद दिले, तर दुसऱ्या टप्प्यात ही संधी सामंत यांना मिळाली; मात्र आपण आमदार केसरकर यांना दुसऱ्या टप्प्यात मंत्रिपद देऊ नये म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांकडे शिफारस केली नव्हती. ते गैरसमज पसरवित आहेत. श्री देव उपरलकर देवस्थानवर विश्वास असेल तर त्यांच्या स्थळामध्ये मी हे सांगत आहे. त्यामुळे आमदार केसरकर यांच्या खोट्या आरोपावर जनता विश्वास ठेवणार नाही. केसरकर यांना पहिल्या टप्प्यांमध्ये मंत्रिपद द्यावे, म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे गळ घातली होती. त्यामुळे केसरकर यांच्या आरोपांवर विश्वास बसणार नाही. आमदार केसरकरांना स्वतःवर कायमच अन्याय होतो असे वाटते. तशी टीका ते करतात, पण जनता त्यांना ओळखते. पुढील काळामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आपल्या हक्काचा आमदार निवडून देईल आणि केसरकरांना त्यांची जागा दाखवेल.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75783 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..