
महामार्गावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा
महामार्गावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा
विनायक राऊत : महामार्ग अधिकाऱ्यांना निर्देश
कणकवली, ता. ९ : महामार्गावर अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी आज महामार्ग अधिकाऱ्यांना दिले. कणकवली उड्डाणपुलावर आणखी उपाययोजना करा, वागदेतील जमीन धारकांना तातडीने मोबदला देऊन बंद असलेली मार्गिका खुली करा असेही आदेश श्री. राऊत यांनी दिले.
येथील विजयभवनमध्ये श्री. राऊत यांनी महामार्ग समस्यांचा आढावा घेतला. कणकवली उड्डाणपुलावर ठेकेदाराच्या चुकीमुळे अपघात होऊन दोन तरूण मृत्यू पडले आहेत. यापुढे असे अपघात होणार नाहीत या दृष्टीने तातडीने उपाययोजना करा, उड्डाणपुलावर ठेवलेले बॅरिकेट सहज दिसतील अशा उपाययोजना करा असे श्री. राऊत म्हणाले. वागदे येथील गोपुरी आश्रम ते गडनदी पुलापर्यंत ज्या जमीन मालकांचा मोबदला मंजूर झाला आहे. त्या मोबदल्याचे तातडीने वाटप करा आणि तेथील बंद असलेली दुसरी मार्गिका सुरू करा असेही निर्देश श्री. राऊत यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने आणि महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांना दिले.
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबार्डे येथील अण्णा भोगले यांच्या घरासमोर सातत्याने अपघात होत आहेत. त्याचबरोबर कुडाळ येथील हॉटेल आरएसएन समोरही अपघात होत आहेत. याठिकाणी पाणी साठणार नाही तसेच अपघाताची कारणे शोधून उपाययोजना करा असे श्री. राऊत म्हणाले. तसेच महामार्गावरील सर्व पुलांवर चार दिवसांतून एकदा सफाई करा म्हणजे पुलावर पाणी साठणार नाही असेही श्री. राऊत म्हणाले.
श्री. राऊत यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक, पर्यटन समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर, वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, तहसीलदार आर. जे. पवार, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उपअभियंता महेश खटी, आप्पा पराडकर, अतुल रावराणे, नीलम पालव, संग्राम प्रभुगावकर, राजू शेटये, सुजित जाधव, सचिन सावंत, रिमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
--------------
सरकारे
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75789 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..