
बीएसएनएलच्या हजारो ग्राहकांचे नेटवर्क गायब
बीएसएनएलच्या हजारो
ग्राहकांचे नेटवर्क गायब
कणकवली, ता. ९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो बीएसएनएल ग्राहकांचे नेटवर्क आज सकाळीच सातच्या सुमारास गायब झाले. दुपारी एकच्या सुमारास नेटवर्क सुरू झाले. मात्र त्यानंतर सायंकाळपर्यंत नेटवर्क येत जात असल्याने ग्राहक हैराण झाले होते. पुणे येथील दूरसंचारच्या कार्यालयात तांत्रिक समस्या उद्भवल्याने हा प्रकार झाल्याचे दूरसंचार अधिकारी ए. एन. सांडे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागातही अजूनही हजारो ग्राहक बीएसएनएल कंपनीच्या सेवेवर अवलंबून आहेत. मात्र ही सेवा वारंवार कोलमडत असते. आज सकाळी सातच्या सुमारास बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाले. तब्बल पाच तासानंतर दुपारी एक वाजता हे नेटवर्क सुरू झाले. त्यानंतर सायंकाळपर्यंत सातत्याने नेटवर्क जात असल्याने ग्राहक हैराण झाले होते. याबाबत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बीएसएनएलच्या पुणे येथील "नेटवर्क अँड ऑपरेशन कंट्रोल" या ठिकाणी तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने रेंज जाण्याची समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. पुणे येथून तांत्रिक समस्या मार्गी लावण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र पुन्हा पुन्हा समस्या निर्माण होत असल्याने, पुणे या ठिकाणी बीएसएनएल च्या वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असल्याची माहिती बीएसएनएलच्या कनिष्ठ दूरसंचार अधिकारी एस ए सांडे यांनी दिली. तसेच ही समस्या नेमकी केव्हा सुटेल याबाबत निश्चित सांगता येणार नाही असे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे मात्र ग्रामीण भागात असलेले बीएसएनएलचे नेटवर्क कोलमडले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75790 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..