
३
चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे
आज रंगणार ‘अभंगवाणी’
रत्नागिरी ः अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त ‘अभंगवाणी’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम उद्या (ता. १०) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मंडळाच्या जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतिगृहातील भगवान परशुराम सभागृहात होणार आहे. कार्यक्रमात रत्नागिरी, गुहागर व चिपळूण येथील कलाकार सहभागी असून प्रसिद्ध कलाकारांबरोबर नव्या उमेदीच्या गायिकासुद्धा कला सादर करतील. कलाकारांना चिपळूण येथील गायक, मार्गदर्शक राजाभाऊ शेंबेकर यांनी मार्गदर्शन केले. चिपळूण येथील गायिका स्मिता करंदीकर, प्रसिद्ध युवा कीर्तनकार कैलास खरे, उदयोन्मुख युवा गायिका मधुरा सोमण आणि युवा गायिका मुक्ता जोशी सहभागी होणार आहेत. तबलासाथ निखिल रानडे, हार्मोनियमसाथ चिपळूणचे अमित ओक, ऑर्गनसाथ ‘सप्तसूर’चे सर्वेसर्वा व पं. विश्वनाथ कान्हेरे यांचे शिष्य निरंजन गोडबोले, पखवाजसाथ संकेत पाडाळकर, तालवाद्यसाथ प्रा. सुहास सोहनी करणार आहेत. निवेदन प्रदीप तेंडुलकर करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीनिवास जोशी, राजेंद्र पटवर्धन, राधिका वैद्य, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाने केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75799 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..