भिरवंडेत कृषीदुतांतर्फे वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिरवंडेत कृषीदुतांतर्फे वृक्षारोपण
भिरवंडेत कृषीदुतांतर्फे वृक्षारोपण

भिरवंडेत कृषीदुतांतर्फे वृक्षारोपण

sakal_logo
By

34915
भिरवंडे ः वृक्ष वाटप कार्यक्रमावेळी ग्रामस्थ.

भिरवंडेत कृषीदुतांतर्फे वृक्षारोपण
कनेडी ः छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषी दिन साजरा केला. भिरवंडे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळा भिरवंडे येथे वृक्ष लागवड केली. तसेच ग्रामस्थांना वृक्ष वाटप केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत, पोस्टमन नंदु सावंत, कृषीसेवक अर्चना केंद्रे तसेच विद्यार्थी रणजित घाडगे, जिवन मदने, मयुरेश जाधव, सौरभ कोकरे, अनिकेत गलांडे आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गावातील शेतकऱ्यांना कृषी विषयक माहिती देण्यात आली.
-----------------
फोंडाघाटात पावसाचा जोर
फोंडाघाट ः येथील पिरसरात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने शेतीच्या कामात अडथला येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांची भातलावनीची कामे सुरू आहेत. काही शेतकऱ्यांनी लावनीची कामे संपवली आहेत. मात्र, बहुतांशी शेतकरी शेतात राबत आहेत. पावसामुळे नदी नाले ओसांडुन वाहत आहेत. मुसळधार पावसाचे पाणी भातशेतीत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75884 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top